Maharashtra Corona Update : चिंताजनक ! राज्यात आज विक्रमी 20,489 नव्या रुग्णांची नोंद

राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या आता 8 लाख 83 हजार 862 एवढी झाली आहे.

एमपीसी न्यूज – राज्यात आज चिंता वाढवणारी कोरोना रुग्णांची आकडेवारी समोर आली आहे. दिवसभरात आजवरची विक्रमी 20 हजार 489 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून आज 312 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

देशात लाॅकडाऊनचा चौथा टप्पा सुरू आहे. राज्यात मिशन बिगीन अगेन अंतर्गत विविध आस्थापना सुरू करण्यासाठी आणखी शिथिलता देण्यात आली आहे.  मात्र, दिवसेंदिवस वाढणारी रुग्णांची संख्या चिंता वाढवणारी आहे.

राज्य आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आजच्या आकडेवारीनुसार, दिवसभरात आज आजवरची विक्रमी 20 हजार 489 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.  तर, 312 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

यासह राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या आता 8 लाख 83 हजार 862 एवढी झाली आहे.

राज्यात सध्या 2 लाख 20 हजार 661 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यातील तब्बल 6 लाख 36 हजार 574 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्याचा रिकव्हरी रेट 72.01 टक्के एवढा आहे.

आजवर राज्यात 26 हजार 276 बाधितांचा मृत्यू झाला आहे. राज्याचा मृत्यूदर तीन टक्क्याहून खाली आला आहे तो सध्या 2.97 टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 45 लाख 56 हजार 707 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 8 लाख 83 हजार 862 (19.3 टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 14 लाख 81 हजार 909 व्यक्ती होमक्वारंटाईन आहेत तर 37 हजार 196 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात पुण्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण आहेत. पुण्यात सध्या 57 हजार 771 सक्रिय रुग्ण आहेत.

पुण्यातील वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, आरोग्य मंत्री राजेश टोपे कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत आज पुण्यातील विधानभवन सभागृहात आढावा बैठक घेतली.

कोरोनाच्या अनुषंगाने तपासण्यांची क्षमता वाढवून बाधित रुग्णांना तात्काळ उपचार मिळवून द्यायला हवेत, अशा सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी केल्या. कोरोना परिस्थिती नियंत्रणासाठी जनजागृतीवर भर द्या, मास्क न वापरणाऱ्यांकडून दंड वसूल करा, अशी सूचनाही त्यांनी याप्रसंगी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.