Maval Corona Update : मावळात आज 159 जणांना डिस्चार्ज; 65 नव्या रुग्णांची भर, 753 सक्रिय रुग्ण

एमपीसीन्यूज : मावळ तालुक्यात मंगळवारी (दि.30) 65 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तालुक्यात दिवसभरात 159 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.आज दोन रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला असून आतापर्यंत 237 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला.

सक्रिय रूग्णांची संख्या 753 आहे. आज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 27 रुग्ण सापडला. लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत 04 रुग्ण व वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत 03 रुग्ण सापडले. सध्या रुग्णालयात 754 रुग्ण उपचार घेत आहेत. तालुक्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 9700 झाली आहे. तर दिवसभरात 159 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

मंगळवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये शहरी भागात 34 रुग्ण सापडले. ग्रामीण भागात कुसगाव बुद्रुक 08, तळेगाव दाभाडे ग्रामीण 04, इंदोरी 03, शिरगाव 02, वराळे 02, धनगव्हाण 02, कामशेत 02, कुरवंडे, वाकसई, नाणे, तुंग, सुदुंबरे, गहूंजे, सोमाटणे, सुदवडी प्रत्येकी 01 एकूण 31 रुग्ण सापडले.

आतापर्यंत 8710 जणांना  डिस्चार्ज देण्यात आला आहे. मावळ तालुक्यातील आज कुसगाव येथे 01 व तळेगाव दाभाडे येथे 01 असे दोन रुग्णाचा मृत्यू झाला. आतापर्यंत 237 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 3143, लोणावळा नगरपरिषद हद्दीत 1798 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 625 रुग्ण सापडले आहेत.

शहरी भागात 5565 रुग्ण तर ग्रामीण भागात 4135 रुग्ण आढळून आले आहेत. एकाही रुग्णांची परिस्थिती गंभीर नाही अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.