Maval : मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी गणेश काकडे

एमपीसी न्यूज – मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (Maval) वरिष्ठ उपाध्यक्षपदी माजी नगरसेवक गणेश काकडे यांची निवड करण्यात आली आहे. गणेश काकडे हे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष आहेत. तसेच त्यांनी तळेगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष म्हणून काम केले आहे.

मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके,मावळ तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष बबनराव भेगडे,संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, मावळ तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे,माजी नगराध्यक्ष सुरेश धोत्रे,सुरेश चौधरी, कृष्णाजी कारके, तळेगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित अध्यक्ष संतोष भेगडे,शिक्षण मंडळ सदस्य विशाल पवार,माजी नगरसेवक अशोक भेगडे,नंदकुमार कोतूळकर, रामभाऊ गवारे, मावळ तालुका अल्पसंख्यांक अध्यक्ष अमीर मुलाणी, विकी लोखंडे, महिला अध्यक्षा तळेगाव दाभाडे राष्ट्रवादी काँग्रेस शैलजा (Maval) काळोखे,माजी उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे यांच्या उपस्थित निवडीचे पत्र देण्यात आले.

Pune – कीर्तनातील जुगलबंदीने रंगले भक्तीचे आख्यान; किर्तन महोत्सव हा स्तुत्य उपक्रम – विवेक वेलणकर

नव्या जबाबदारीसह पक्ष बळकट करण्याबरोबरच आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून समाजकार्यासाठी योगदान देऊ हा विश्वास आहे असे काकडे यांनी सांगितले. आगामी काळात संघटना बांधणीवर लक्ष केंद्रित करण्यात येणार असून ग्रामीण भागातील तळागाळापर्यंत पक्षाचे कार्य पोहोचविण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे काकडे म्हणाले.

गणेश काकडे हे नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष तसेच तळेगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी यशस्वी जबाबदारी सांभाळली आहे. वरिष्ठ उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल उपस्थित मान्यवरांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.