Maval : ग्रामपंचायत निवडणूक; 151 जागांसाठी 217 उमेदवार रिंगणात

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील 19 ग्रामपंचायतींची निवडणूक (Maval ) जाहीर झाली. त्यातील चार ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली असून दोन गावांमधील सरपंच पदांची बिनविरोध निवड झाली आहे. आता 15 गावांमधील 151 जागांसाठी 217 जणांचे उमेदवारी अर्ज आले आहेत. या निवडणुकीसाठी 5 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत 20 ऑक्टोबर पर्यंत होती. त्यानंतर 23 ऑक्टोबर रोजी अर्जांची छाननी झाली. या छाननी मध्ये 13 जणांचा अर्ज बाद झाले. 25 ऑक्टोबर पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत होती. सरपंच पदाच्या 19 जागांसाठी 117 उमेदवारी अर्ज आले होते. त्यातील 49 जणांनी अर्ज माघारी घेतले असून आता 13 गावच्या सरपंच पदासाठी 68 जण रिंगणात आहेत.

तालुक्यातील दिवड, मळवंडी ढोरे, भाजे, सांगिसे, कोंडीवडे, उदेवाडी, शिळिंब, मुंढावरे या ग्रामपंचायत निवडणुकीत तिरंगी (Maval ) लढत पहायला मिळणार आहे. सन 2019 पर्यंत तालुक्यावर भाजपचे वर्स्वच होते. आता राष्ट्रवादीचे सुनील शेळके निवडून आल्याने तालुक्यावर राष्ट्रवादीचे वर्चस्व असल्याचे दिसते. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत निवडणुका महत्वाच्या ठरणार असल्याने भाजप आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पूर्ण ताकद लावल्याचे चित्र आहे.

Pune : सूर्यदत्तमध्ये दुसऱ्या राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत 400 पेक्षा अधिक खेळाडूंचा सहभाग

चार ग्रामपंचायती बिनविरोध

मावळ तालुक्यात 19 गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणूक लागली आहे. त्यातील बेबडओहोळ, आढले बुद्रुक, लोहगड आणि ओव्हाळे या चार ग्रामपंचायतींची पूर्ण निवडणूक बिनविरोध पार पडली. त्यामुळे या गावांमध्ये मतदान प्रक्रिया होणार नाही. तर शिरगाव आणि पुसाणे या गावांमध्ये सरपंच पदाची निवडणूक बिनविरोध झाली आहे. या दोन गावांमध्ये सदस्य पदांची प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.