Maval News : गणेश विसर्जनासाठी वडगावात सात ठिकाणी कृत्रिम हौद; मूर्तीदान, मूर्ती संकलनाची व्यवस्था

एमपीसी न्यूज – वडगाव नगर पंचायतच्या वतीने वडगावमध्ये सात ठिकाणी कृत्रिम हौद बांधण्यात आले आहेत. या हौदांमध्येच नागरिकांनी गणेश विसर्जन करावे, असे आवाहन नगराध्यक्ष मयूर ढोरे, उपनगराध्यक्षा पूजा वहिले आणि मुख्याधिकारी जयश्री काटकर यांनी केले. सार्वजनिक गणेश मंडळांनी इंद्रायणी नदीच्या किनारी विसर्जन करावे. ज्यांना मूर्ती दान करायचे आहे त्यांनी नगरपंचायत जुनी इमारत येथे मूर्तीदान करावे असेही सांगण्यात आले आहे.

माळीनगरला क्रिकेट ग्राउंड जवळ, विजयनगर कॉलनीत महसूल भवन पार्किंग शेजारी, केशवनगरला पाण्याच्या टाकी शेजारी, प्रभाग 16 मध्ये पाण्याच्या टाकी शेजारी, विशाल लॉन्समागे संभाजीनगर परिसर, संतोष खैरे यांच्या निवास्थानाजवळ व वडगाव नगरपंचायत जुनी इमारत या सात ठिकाणी कृत्रिम हौद तयार करण्यात आले आहेत. या हौदातच नागरिकांनी गणपतींचे विसर्जन करावे.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी श्रींचे विसर्जन इंद्रायणी नदीच्याकाठी करावे. ज्या गणेशभक्तांना गणेशमूर्ती दान करावयाच्या आहेत त्यांनी नगरपंचायत जुनी इमारत येथे मूर्तीदान संकलन केंद्रामध्ये मूर्ती दान करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

महादेव मंदिर विहिर,चावडी चौक येथील विहिर व ग्रामदैवत पोटोबा महाराज मंदिर परिसरातील तळे या ठिकाणी कोणीही मूर्ती विसर्जन करू नये, असेही आवाहन नगराध्यक्ष ढोरे व उपनगराध्यक्षा वहिले यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.