Maval News : मावळ तालुक्यातील पहिल्या ऑक्सिजन प्लांटचे उद्घाटन

एमपीसी न्यूज – कान्हे येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्था पुणे यांनी त्यांच्या सीएसआर फंडातून कान्हे शासकीय ग्रामीण रुग्णालयात हवेतून ऑक्सिजन निर्माण करणारा प्लांट उभारण्यात आला आहे.

या प्लांटचे उद्घाटन मंगळवारी (दि.1) खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनिल शेळके व जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेचे सीईओ अनिल भंडारे यांच्या हस्ते झाले. मावळात ऑक्सिजन प्लांट झाल्याने वैद्यकीय क्षेत्रातील तसेच नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

याप्रसंगी प्रांताधिकारी संदेश शिर्के, तहसीलदार मधुसुदन बर्गे, गटविकास अधिकारी सुधीर भागवत, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.जयश्री ढवळे, वैद्यकीय समन्वयक गुणेश बागडे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंता वैशाली भुजबळ, राष्ट्रवादी ग्रामीण ब्लॉक अध्यक्ष सुभाष जाधव, शिवसेना तालुकाप्रमुख राजु खांडभोर, सरपंच विजय सातकर, नगरसेवक संतोष भेगडे, ज्येष्ठ नेते नारायण ठाकर, प्रकाश आगळमे, किशोर सातकर आदी उपस्थित होते.

“या ऑक्सिजन प्लांटमुळे कान्हे रुग्णालय ऑक्सिजन निर्मितीत स्वयंपूर्ण होऊन येथील ऑक्सिजनची कमतरता दूर होण्यास मदत होणार आहे. भविष्यातील ऑक्सिजनची गरज ओळखून संस्थेने ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी पुढाकार घेतला, याबद्दल मावळच्या जनतेच्या वतीने त्यांचे आभार मानतो.” असे आमदार शेळके म्हणाले.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मावळ तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्याने ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला होता. यामुळे वैद्यकीय अधिकारी व रुग्णांच्या नातेवाईकांना ऑक्सिजन सिलेंडरसाठी धावपळ करावी लागत होती. यापुढे कोरोना काळात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्था पुणे यांनी पुढाकार घेऊन हवेतून ऑक्सिजनची निर्मित्ती करणारा प्लांट कान्हे येथील ग्रामीण रुग्णालयात उभारला आहे.

या ऑक्सिजनच्या प्लांटच्या माध्यमातुन प्रतिमिनीट 150 लिटर ऑक्सिजनची निर्मित्ती होणार आहे. यामुळे कान्हे येथील ग्रामीण रुगणालयात पुरेसा ऑक्सिजन उपलब्ध होणार असून या रुग्णालयाला ऑक्सिजनसाठी पर्यायी यंत्रणेवर अवलंबुन राहण्याची गरज पडणार नाही, असे कान्हे ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ.जयश्री ढवळे यांनी सांगितली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.