Maval News : महागाईच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसची निदर्शने; पेट्रोल, डिझेल, खतांची दरवाढ मागे घेण्याची मागणी

एमपीसीन्यूज : केंद्र सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन लावला असून कोरोनाच्या काळात सर्वसामान्यांचे उद्योगधंदे बंद पडले आहेत तर अनेक कामगारांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. केंद्र सरकारने पेट्रोल, डीझेल, गॅस, रासायनिक खते व जीवनावश्यक वस्तूंच्या दरात 55 ते 60  टक्के वाढ करून सर्वसामान्यांचे जगणे महाग केले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व त्यांचे बगलबच्चे कोरोनाच्या काळात राज्य सरकारला मदत करण्याऐवजी गलिच्छ राजकारण करत असल्याचे टीकास्त्र राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळ तालुका अध्यक्ष बबन भेगडे यांनी भाजपवर सोडले.

केंद्र सरकारने वाढवलेल्या महागाईने सर्वसामान्यांचे जगणे अवघड केले आहे. या तुघलकी सरकारचा भेगडे यांनी जाहीर निषेध व्यक्त केला.

केंद्र सरकारने पेट्रोल, डीझेल, गॅस, रासायनिक खते व जीवनाश्यक वस्तूंच्या  किंमती वाढवून सर्वसामान्यांचे जगणे महाग केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने मावळचे आमदार सुनिल शेळके, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे व संत तुकाराम साखर कारखाना उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (दि.२०) सकाळी 11 वाजता वडगाव मावळ येथे निदर्शने करून ‘जोडे मारो’ आंदोलन करून केंद्र सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला.

या नंतर मावळचे प्रभारी तहसीलदार रावसाहेव चाटे यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक व ज्येष्ठ नेते सुभाष जाधव, राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य विठ्ठल शिंदे,नगरसेवक गणेश खांडगे, गणेश अप्पा ढोरे,पंचायत समिती सदस्य साहेबराव कारके, कृष्णा दाभोळे, मंगेश काका ढोरे, अशोक घारे, खादी ग्रामोद्योग संघाचे अध्यक्ष अंकुश आंबेकर, नगरसेवक राजेंद्र कुडे,चंद्रजीत वाघमारे, अतुल राऊत, राजेंद्र बाफना, युवक तालुकाध्यक्ष सुनिल दाभाडे, कैलास गायकवाड, नवनाथ चोपडे, सरपंच नामदेव शेलार, राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्ष सुवर्णा राउत, नगरसेविका वैशाली दाभाडे, मंजुश्री वाघ, सुनिता काळोखे, शीतल हगवणे, रुपाली दाभाडे, विना कारंडे, उमा शेळके, सविता मंचरे व बहुसंख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रास्ताविक ज्येष्ठ नेते सुभाष जाधव यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.