Gold price : सोन्याच्या किमतीत प्रचंड वाढ, गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर सोने 75 हजार प्रति तोळा होण्याची शक्यता

चांदीच्या दरातही वाढ

एमपीसी न्यूज : गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला सोन्याचा भाव 734०० प्रति तोळा (Gold price) पोहोचला आहे. उद्या (दि.9) गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर सोन्याचा भाव 75००० रु. प्रति तोळा जाऊ शकतो असे तद्यांचे मत आहे.

मराठी संस्कृतीत साडेतीन मुहूर्तांपैकी एक असे गुढी पाडव्याला विशेष महत्त्व आहे. महाराष्ट्रीयन संस्कृतीत गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर सोने (Gold price) घेण्याची परंपरा आधीपासूनच आहे. आज सोमवारी (दि. 9 एप्रिल) ला सोन्याचा भाव 73००० रु. प्रति तोळा पोहोचला असून उद्या 75 हजारांचा टप्पा ओलांडणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आगामी काळात लग्नसराईमुळे सोने आणि चांदीचा भाव गगनाला भिडू शकतो की  काय या कडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. आज (दि. 8 एप्रिल) ला सोन्याचा भाव प्रति तोळा 734०० रु. तर चांदीचा भाव 83 हजार 9०० रुपये इतका नोंदविण्यात आला.

Operation Nanhe Farishte : ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ अंतर्गत वर्षभरात 1064 भरकटलेल्या मुलांची सुटका

अमेरिकेची  मध्यवर्ती बँक असलेल्या  फेडरल बँकेने  व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, इस्रायल – हमास संघर्ष, रशिया – युक्रेन युद्ध, इंधनाच्या किमतीत होत असणारी वाढ  आदी कारणांमुळे  सोन्याच्या किमतीत वाढ होताना दिसत आहे. सध्याच्या  भू-राजकीय अस्थिर परिस्थितीमुळे जगातील सर्व लोक सोन्याकडे सुरक्षित गुंतवणूकीचा पर्याय म्हणून पाहत आहेत.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.