Maval News: पुणे-लोणावळा लोहमार्गावरील तीन रेल्वे फाटक सोमवारी बंद

एमपीसी न्यूज – पुणे-लोणावळा लोहमार्गावरील मळवली, बोरज आणि नाणे रेल्वे फाटक सोमवारी (दि. 22) बंद राहणार आहेत. दुरुस्तीची कामे सुरु असल्याने हे तीन फाटक काही वेळेसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत.

मळवली रेल्वे स्थानकाजवळ असलेले मळवली फाटक (फाटक क्रमांक 36) सोमवारी सकाळी आठ ते दुपारी एक वाजेपर्यंत बंद राहील. या कालावधीत नागरिकांना जवळच असलेले बोरज फाटक प्रवासासाठी खुले असेल.

मळवली रेल्वे स्थानकाजवळ असलेले बोरज फाटक (फाटक क्रमांक 38) दुपारी एक ते सायंकाळी सहा या कालावधीत बंद राहणार आहे. या कालावधीत नागरिकांना जवळच असलेले मळवली फाटक प्रवासासाठी खुले असेल.

तर नाणे फाटक (फाटक क्रमांक 43) सकाळी आठ ते सायंकाळी सहा या कालावधीत बंद राहील. या वेळी नागरिकांना वडिवळे फाटक (फाटक क्रमांक 42) प्रवासासाठी खुले असेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.