Maval : ज्येष्ठ कृषीतज्ञ जयकुमार आवटे यांचे निधन

एमपीसी न्यूज – ज्येष्ठ कृषीतज्ञ व संत तुकाराम सहकारी साखर (Maval) कारखान्याचे माजी तज्ञ संचालक जयकुमार गणपतराव आवटे पाटील (वय 83) यांचे गुरुवारी (दि. 18) निधन झाले.
जयकुमार आवटे यांनी संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या उभारणीत मोठे योगदान दिले होते. कृषी पदव्युत्तर शिक्षण घेऊन त्यांनी त्या ज्ञानाचा सर्व सामान्य शेतकरीवर्गाला लाभ देऊन मार्गदर्शन केले. मावळ तालुक्यातील मोठमोठ्या पाणी योजना करून शेतक-यांना शेतीसाठी पाणी दिले. आवटे हे मूळचे जुन्नर तालुक्यातील राजुरी येथील होते. ते मागील अनेक वर्षांपासून मावळ तालुक्यातील सोमाटणे येथे वास्तव्यास होते.

जयकुमार आवटे यांचा सोमाटणे येथे अंत्यविधी झाला. यावेळी कृषी, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रातील अनेकजण उपस्थित होते. आवटे यांचे सामाजिक क्षेत्रातील काम उल्लेखनीय असून त्यांचा सर्व क्षेत्रातील मान्यवरांशी चांगला संपर्क होता. त्यांचे कृषी क्षेत्रातील काम मावळ तालुक्यासाठी संस्मरणीय आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. उद्योजक अतुल आवटे, उद्योजक सागर आवटे व कन्या दिपाताई हिरे यांचे ते वडील (Maval) होत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.