Maval: सावळा येथे सौरऊर्जा संचालित जलसिंचन प्रकल्पाचे लोकार्पण

एमपीसी न्यूज- निगडी रोटरी क्लब, पूजा कास्टिंग प्रा. लि. व  मावळ प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने मावळ तालुक्यात दुर्गम भागातील सावळा या गावामध्ये गोरगरीब शेतकऱ्यांना शेतीसाठी सौरऊर्जा संचालित जलसिंचन प्रकल्प सुरु करण्यात आला. त्याचे लोकार्पण आज सर्व संस्थांचे सर्व मान्यवर व पदाधिकाऱ्यांच्या  उपस्थितीत सावळा येथे संपन्न झाले.

यावेळी मावळ प्रबोधिनीचे संस्थापक रवींद्र भेगडे, रोटरी क्लब ऑफ निगडीचे अध्यक्ष विजय काळभोर, पूजा कास्टिंग प्रा. लि.चे अध्यक्ष अनिल कुलकर्णी, सेक्रेटरी प्रणीता अलूरकर, केशव मांगे, गुरदीप सिंग, प्रवीण धणेगांवकर, गुरविंदर सिंग, हरिचंद्र उटगे, संजीव अलूरकर, साधना काळभोर, रामा मांगे, कमल कौर आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.