Maval : मावळ मतदारसंघात 59.49 टक्के मतदान

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदारसंघातील 21 उमेदवारांचे भवितव्य सोमवारी (दि. 29) मतदानयंत्रात बंद झाले आहे. दिवसभरात 59.49 टक्के मतदान झाले. गेल्यावेळी पेक्षा 2 टक्के हे मतदान कमी झाले आहे. नवमतदार, ज्येष्ठ मतदारांमध्ये मतदानादरम्यान मोठा उत्साह होता. सेलिब्रिटी, उद्योजकांनी देखील आपला मतनाचा हक्क बजाविला आहे. निकाल 23 मे रोजी असल्याने उमेदवारांची तोपर्यंत धाकधूक राहणार आहे.

राज्यातील शेवटच्या चौथ्या टप्यासाठी सोमवारी मतदान पार पडले. त्यामध्ये मावळ लोकसभा मतदारसंघाचा समावेश होता. मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप-रिपाइं-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार, खासदार श्रीरंग बारणे, राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस-शेकाप-स्वाभिमानी शेतकरी संघटना, आरपीआय (कवाडे गट)गवई गट, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष आघाडीचे पार्थ पवार, बहुजन समाज पार्टीचे संजय किसन कानडे, वंचित बहुजन आघाडीचे राजाराम पाटील, यांच्यासह 21 उमेदवार रिंगणात आहेत. खरी लढत महायुतीचे श्रीरंग बारणे महाआघाडीचे पार्थ पवार यांच्यात लढत आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघात 22 लाख 97 हजार 405 मतदार आहेत. 11 लाख 66 हजार 272 पुरुष मतदार तर महिला 10 लाख 61 हजार 329 महिला मतदार होते. त्यापैंकी 59.49 टक्के मतदारांनी मतदान केले. मावळातील दोन हजार 504 मतदान केंद्रावर मतदान झाले. मतदारांचा मोठा प्रतिसाद दिसून आला. सोमवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत 6.64 टक्के मतदानाची नोंद झाली होती. तर, सकाळी 11 वाजेपर्यंत 18.11 टक्के, दुपारी एक वाजता 31.85 टक्के मतदानाची नोंद झाली होती. तर, 3 वाजता 42.37 टक्के मतदानाची नोंद झाली होती. सायंकाळी पाच वाजेपर्यंत 53.13 टक्के मतदानाची नोंद झाली होती. सायंकाळी सहा वाजेपर्यंत 58.21 टक्के मतदानाची नोंद झाली होती. शेवटच्याक्षणी मतदार आल्याने एकूण 59.49 टक्के मतदान झाले. सर्वाधिक 67.76 % मतदान कर्जत विधानसभा मतदारसंघात झाले.

मावळ लोकसभा मतदारसंघ 59.49%

पनवेल 55.33 %
कर्जत 67.76 %
उरण 67.21 %
मावळ 62.60 %
चिंचवड 56.29%
पिंपरी 50.74 %

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.