Pimpri: महापौर जाधव यांनी केले बार्सिलोनाकडे टेकऑफ! 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराचे महापौर राहुल जाधव यांनी आज (गुरुवारी) बार्सिलोनाकडे टेकऑफ केले. स्मार्ट सिटीच्या अभ्यास दौ-यात तीन दिवसांनी ते सहभागी होणार आहेत.

स्पेन येथील बार्सिलोना शहरात 13 ते 15 नोव्हेंबर दरम्यान ‘स्मार्ट सिटी एक्स्पो वर्ड काँग्रेस 2018’ या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.  स्पेन देशातील बार्सिलोना शहरात 13 ते 15 नोव्हेंबर दरम्यान ‘स्मार्ट सिटी एक्स्पो वर्ड काँग्रेस 2018’ या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेला उपस्थित राहण्याचे निमंत्रण ‘रिप्रेझेंटेटिव्ह स्मार्ट सिटी वर्ल्ड काँग्रेस’ यांच्याकडून पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीला मिळाले होते.

त्यानुसार सभागृह नेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने, मनसेचे गटनेते सचिन चिखले, शिवसेना नगरसेवक प्रमोद कुटे, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा आयुक्त आयुक्त श्रावण हर्डीकर, सह मुख्य कार्यकारी अधिकारी निळकंठ पोमण आणि सह शहर अभियंता राजन पाटील यांनी सोमवारीच टेकऑफ केले होते.   त्यानंतर दौ-याच्या तिस-या दिवशी म्हणजेच आज महापौर राहुल जाधव यांनी दौ-यात सहभागी होण्यासाठी बार्सिलोनाकडे ‘टेकऑफ’ केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.