Kamshet News : गीता फाऊंडेशनच्या वतीने गुणवंत विद्यार्थीचा सत्कार

एमपीसी न्यूज :  कामशेत येथील व्यापारी व गीता फाऊंडेशनचे संचालक मुकेश मुथा यांच्या वाढदिवसानिमित्त गीता फाऊंडेशनच्या वतीने कै उषाताई लोखंडे चॅरिटेबल ट्रस्ट पुणे संचलित माध्यमिक विद्यालयातील  इ 8 वी ते 10 वी मधील सन 2019-20 मधील प्रथम तीन गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण संपन्न झाला. 

यावेळी  ज्ञानेश्वर माऊली भांगरे, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष गुलाब जाधव, भाऊ शिरसट, डाॅ विकेश मुथा, विश्वनाथ टाकळकर हे मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना  मेडल, पुष्पगुच्छ व शैक्षणिक साहित्य संच देवून गौरव करण्यात आला. तसेच यावेळी सर्व विद्यार्थ्यांना पेन व खाऊचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक अंबादास गर्जे तर आभार अनिल शिंदे यांनी मानले. कार्यक्रमाचे संयोजन प्रभारी मुख्याध्यापिका श्रीमती सुनीता वंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थापक/ अध्यक्ष  लक्ष्मणराव लोखंडे ,सरपंच बबनराव टाकळकर यांनी अभिनंदन केले आहे.

प्राविण्यप्राप्त विद्यार्थी खालीलप्रमाणे.*

🔹 *इ 8 वी- 2019-20*🔸

*प्रथम* – साक्षी अंकुश शिरसट -86.00%

*द्वितीय*-दिशा मनोहर खेंगले -82.66%

*तृतीय*-प्रांजली हनुमंत टाकळकर -80.00%

—————————————

 🔹 *इ 9 वी- 2019-20*🔸

*प्रथम* – वैष्णवी गुलाब जाधव -88.83%

*द्वितीय*-श्रेया अनिल गरूड -79.83%

*तृतीय*-साक्षी मनोहर खेंगले-79.33%

—————————————

🔹 *इ 10 वी- 2019-20*🔸

*प्रथम* – आदित्य गुलाब जाधव -82.80%

*द्वितीय*-ओंकार बाळू टाकळकर -76.40%

*तृतीय*-नम्रता शिवाजी कुटे 73.60%

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.