Pimpri : मेट्रोच्या लोहमार्ग निर्मितीचे काम गुरुवारपासून सुरू

एमपीसी न्यूज – मेट्रो डिसेंबर २०१९ मध्ये धावणार असून, वनाज ते गरवारे महाविद्यालय हा साधारण ५ किलोमीटरचा मार्ग सुरू करण्यात येणार आहे. तर पिंपरी चिंचवडमध्ये ६ किलोमीटरवर मेट्रो धावणार आहे. त्यासाठी आवश्यक असणारे रूळ नागपूर मेट्रोकडून मागवण्यात आले असून गुरुवारपासून लोहमार्ग निर्मितीचे काम हाती घेण्यात आले आहे. 

पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मेट्रो मार्गावर पिंपरी-चिंचवड ते रेंजहिल्स या ११.५७ किमी टप्प्यात अत्यंत वेगाने उन्नत मार्ग उभारण्याचे काम सुरु आहे. या मार्गावरच मेट्रोने डिसेंबर २०१९ मध्ये चाचण्या पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे. या अनुषंगाने यामार्गावर लोहमार्ग टाकण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. टाकण्यात येणारे रूळ हे स्टॅंडर्ड गेज या प्रकारातले असून बॅलास्ट विरहीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.