Pune : कल्याणीनगर मार्गे वळवलेल्या वनाज ते रामवाडी मेट्रो मार्गाची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

एमपीसी न्यूज – मेट्रोच्या वनाज ते रामवाडी हा मेट्रो मार्ग राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाने आगाखान पॅलेस समोरू घेऊन जाण्यास मज्जाव केल्याने कल्याणी नगर मार्गे वळवण्यात आला आहे. या मार्गाला कल्याणीनगर मधील सामाजिक कार्यकर्त्यांनी याला विरोध करून त्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी सुनावणी घेऊन ही याचिका फेटाळण्यात आली आहे.

या आधी देखील अशा प्रकारे २ वेळा मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून मेट्रो मार्ग कल्याणीनगरद्वारे वळविण्यास स्थगितीची मागणी करण्याऱ्या जनहित याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. मात्र, मागील दोन्ही वेळा मुंबई उच्च न्यायालयाने या संदर्भातील जनहित याचिका फेटाळल्या आहे. उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे मेट्रो मार्गातील सर्व अडथळे दूर झाले असून यामार्गावर वेगाने मेट्रोचे बांधकाम सुरु करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.