Mhalunge accident : म्हाळुंगे येथे कंटेनर धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज : कंटेनरने पाठीमागून दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. (Mhalunge accident) ही घटना सोमवारी (दि. 19) रात्री तळेगाव-चाकण रोडवर म्हाळुंगे येथे घडली.

अभिमन्यू केशव प्रधान (वय 36, रा. लांडेवाडी, भोसरी) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी रामेश्वर अच्युतराव हळदे (वय 51, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) यांनी महाळुंगे चौकीत फिर्याद दिली आहे. त्यानुसार कंटेनर चालक भुलन सितलाप्रसाद बिंद (वय 42, रा. नवी मुंबई) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Maharashtra News : मंत्री चंद्रकात पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षणाबाबत मंत्रिमंडळ उपसमिती गठीत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हळदे आणि अभिमन्यू प्रधान हे महाळुंगे येथील के के इंटरप्रायजेस या कंपनीत काम करत होते. सोमवारी रात्री ते काम संपल्यानंतर दुचाकीवरून घरी जात होते.(Mhalunge accident) तळेगाव-चाकण रोडने जात असताना आरोपीने त्याच्या ताब्यातील कंटेनर जोरात चालवून फिर्यादी यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. त्यात अभिमन्यू हे कंटेनरच्या उजव्या चाकाखाली आल्याने चिरडले गेले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. म्हाळुंगे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.