Pune : येरवडा कारागृहात पुन्हा मोबाईल सापडला; कारागृह कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – मागील काही दिवसांपासून पुण्यातील (Pune) येरवडा मध्यवर्ती कारागृहात कैद्यांकडे मोबाईल सापडण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत.. अशा प्रकारच्या घटना सातत्याने घडत आहेत. अशाच प्रकारचा आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. येरवडा मध्यवर्ती कारागृहातील एका कर्मचाऱ्यानेच कैद्यांना सिमकार्ड आणि मोबाईल पुरविल्याचे समोर आले आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने याबाबतचा तपास केला असून संबंधित कर्मचारी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Wakad : सासूकडून दहा लाखांची खंडणी घेण्यासाठी बापाने केले मुलींचे अपहरण

मीनानाथ कराळे असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी, त्याच्या विरुद्ध येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या वर्षभरात कारागृहात कैद्यांकडे मोबाईल आढळल्याचे नऊ गुन्हे उघडकीस आले आहेत.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, येरवडा कारागृह हे राज्यातील महत्त्वाचे काराग्रह आहे. राज्यभरातील महत्त्वाच्या गुन्ह्यातील वेगवेगळे गुन्हेगार या कारागृहात बंद आहेत. यासाठी कारागृहात मोठी सुरक्षा व्यवस्था देखील आहे. मात्र असे असतानाही मोबाईल सापडण्याच्या घटना मागील वर्षभरात मोठी वाढ झाली आहे.

येरवडा कारागृहातील कराळे याने बंदी असलेला आरोपी गोविंद ताकभाते याला कारागृहात मोबाईल दिला. ताकभाते याच्याकडे गुन्हे शाखेने तपास केला. त्यावेळी कैदी लक्ष्मण वाघ याने, कराळेने आपल्याला मोबाईल दिल्याचे सांगितले. सिमकार्डची सोय करण्यास सांगितल्यानंतर कराळे याला वाघ याच्या आईच्या नावावर सिमकार्डची सोय कर असे म्हटले होते. त्यावेळी कराळे याने सिमकार्ड दिल्याचे ताकभाते याने सांगितले.

ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी आणखी दोन व्यक्तींची चौकशी केली. त्यामध्ये आमिर फरिद शेख उर्फ आंड्या आणि मोबाईल दुकानदार अल्पेश देवसिंग राजपुरोहीत. त्यावेळी, कराळे याने जेलरोड पोलिस चौकीजवळ न्यु भैरव कम्युनिकेशन मोबाईल शॉपीमधून मोबीन शेख नावाने मोबाईल खरेदी केल्याचे समोर आले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.