Bhosari : भाजप महिला पदाधिका-यांचा, भाजप तालुका अध्यक्षाकडून विनयभंग

एमपीसी न्यूज – भाजपच्या भोर-वेल्हा तालुका अध्यक्षाने पिंपरी चिंचवड भाजप महिला पदाधिकारी अश्लिल व्हिडीओ पाठवून विनयभंग केला. ही घटना मागील दोन आठवड्यांपासून घडली आहे.

याप्रकरणी 40 वर्षीय भाजप महिला पदाधिकारी यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार भाजप भोर-वेल्हा तालुका अध्यक्ष आनंद देशमाने याच्या विरोधात एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंद देशमाने हा वेल्हा तालुक्याचे भजपचे तालुका अध्यक्ष आहे. पीडित महिला पदाधिकारीसोबत आरोपीची मागील तीन वर्षांपूर्वी एका सामाजिक कार्यक्रमामध्ये ओळख झाली होती. त्यावेळी आरोपी देशमाने याने पीडित महिलेचा मोबाईल नंबर घेतला होता. दोन आठवड्यापासून आनंद देशमाने हा महिलेच्या व्हॉटस्अॅपवर मेसेज पाठवत होता. महिलेने त्याला कोणताही प्रतिसाद दिला नाही. वारंवार येणाऱ्या मेसेजला कंटाळलेल्या महिलेने रविवारी (फी. 28) रात्री प्रतिसाद दिला असता आरोपीने त्यांना अश्लील व्हिडिओ पाठवला. यावरून भाजप महिला पदाधिकारी यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.