Pune : मदतीसाठी धन्यवाद देणा-या तरुणीला ‘किस’ करून आरोपी पसार

लष्कर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – मदत केल्याबद्दल धन्यवाद देण्यासाठी हात पुढे केलेल्या तरुणीला किस करून आरोपी इसम फरार झाला. या प्रकारामुळे गडबडून गेलेल्या तरुणीने लष्कर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात इसमावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. ही घटना कॅम्प परिसरातील अरोरा टॉवर परिसरात काल (सोमवार) भर दुपारी साडेबारा वाजता घडली.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी ही कॅम्प परिसरातील अरोरा टॉवर येथून जात असताना ती रस्ता चुकली. नेमका याच वेळी तिचा मोबाईलही स्विच ऑफ झाला. यामुळे मित्राला याची माहिती देण्यासाठी तिने जवळच उभ्या असलेल्या एका व्यक्तीला (वय अंदाजे 40) मित्राला फोन करायचा असून मोबाईल देण्याची विनंती केली. त्या व्यक्तीने तिला त्याचा मोबाईल दिला. त्या तरुणीने मित्राला रस्ता चुकल्याची माहिती दिली. बोलणे झाल्यावर तिने या व्यक्तीकडे त्यांचा फोन परत करीत धन्यवाद देण्यासाठी हात पुढे केला.

मात्र, त्याने संधी साधून तरुणीला किस केले. अचानक घडलेल्या या अनपेक्षित प्रकारामुळे तरुणी गोंधळली तोपर्यंत आरोपीने तेथून धूम ठोकली. त्यानंतर तरुणीचा मित्र आला असता तिने लष्कर पोलीस ठाण्यात याप्रकराची तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे इसमाचा फोटो मिळाला असून पोलीस घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.