Monsoon Update: 1 जूनला केरळमध्ये मान्सून सुरू होण्याची शक्यता, हवामान खात्याचा सुधारित अंदाज

Monsoon Update: Monsoon likely to make onset over Kerala around June 1: IMD

एमपीसी न्यूज -पश्चिम-मध्य आणि लगतच्या नैऋत्य अरबी समुद्रावर आज (गुरुवारी) कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. येत्या तीन दिवसांत ते अधिक तीव्र होऊन वायव्येकडे दक्षिण ओमान आणि पूर्व येमेनच्या सीमेच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे मान्सून पुढे सरकण्यास अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वी वर्तविलेल्या अंदाजापेक्षा आधी म्हणजेच त्याच्या नेहमीच्या निर्धारित दिवसाच्या अर्थात एक जूनच्या आसपास मान्सून केरळच्या किनारपट्टीवर दाखल होईल, असा सुधारित अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) आज जाहीर केला. 

अरबी समुद्रावर 31 मे ते 4 जून दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र विकसित होण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाची तीव्रता वाढण्याची शक्यता असली तरी त्याचा भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर परिणाम होणार नाही, असे आयएमडीच्या शास्त्रज्ञांनी सांगितले. “अत्यंत तीव्र वाहून जाणारे विखुरलेले कमी व मध्यम ढग दक्षिण पूर्व आणि पश्चिम मध्य अरबी समुद्रावर पसरले आहेत.” असे आयएमडीने चक्रीवादळासंदर्भातील वार्तापत्रात म्हटले आहे.

आयएमडीचे महासंचालक एम महापात्रा म्हणाले की, “दुसर्‍या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पश्चिम किनारपट्टीवर पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि मान्सूनच्या प्रगतीसाठी पूर्वीच्या अपेक्षेपेक्षा आता परिस्थिती अनुकूल आहे. केरळमध्ये एक किंवा 2 जूनच्या आसपास मान्सून सुरू होण्याची आपण अपेक्षा करू शकतो. ”

ते पुढे म्हणाले, “हा कमी दाबाचा परिसर भारतीय किनारपट्टीच्या जवळ आहे आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे. सध्याचे कमी दाबाचे क्षेत्र आपल्या किनाऱ्यापासून बरेच दूर असून पश्चिम किनाऱ्यावर त्याचा फारसा परिणाम होण्याची शक्यता नाही. तीव्र कमी दाबाचे क्षेत्र येमेन आणि ओमानच्या किनारपट्टीच्या अगदी जवळ आहे. ”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.