Monsoon Update : 20 ऑगस्टपासून मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची चिन्हे

एमपीसी न्यूज – सध्या मान्सून (Monsoon Update) राज्यात विश्रांती घेतली असली तरी 20 ऑगस्ट पासून मान्सून पुन्हा सक्रिय होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

मागील महिन्याभरापासून पावसाने (Monsoon Update) विश्रांती घेतली आहे. राज्यात अनेक शहरात पावसाची प्रतीक्षा आहे. जून आणि जुलै महिन्यात बऱ्यापैकी चांगला पाऊस पडला. ज्यामुळे शेतकरी काही प्रमाणात सुखावला. मात्र ऑगस्ट मध्ये पावसाने चांगलाच ब्रेक घेतला आहे. त्यामुळे नागरिकांची आणि शेतकऱ्यांची चिंता पुन्हा एकदा वाढली आहे. तब्बल 51 वर्षांनी पावसाने एवढा मोठा ब्रेक घेतल्याचं हवामान खात्याने सांगितलं आहे.

Tiranga Rally : स्वातंत्र्य दिनानिमित्त आळंदीत तिरंगा रॅली

दरवर्षीच्या सरासरीपेक्षा यंदा कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे मान्सूनची आकडेवारीत मोठा फरक जाणवला आहे. यापूढे पावसाची काही प्रमाणात शक्यता आहे. हा ड्राय स्पेल सध्या मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात आणि पश्चिम विदर्भात बघायला मिळेल. 18 ऑगस्टनंतर मात्र हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस (Monsoon Update) पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. 19 आणि 20 ऑगस्टला विदर्भात  काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

बंगलच्या उपसागरात ढग बघायला मिळत आहे. हे ढग उत्तर पश्चिमेच्या दिशेने सरकताना दिसतायत. ज्याचा परिणाम 3-4 दिवसांनी विदर्भात बघायला मिळेल. मात्र मध्य महाराष्ट्रात ब्रेक कायम राहणार आहे. बंगालच्या खाडीत होत असलेल्या बदलांचा परिणाम आपल्याला मध्य महाराष्ट्रात दिसणार नसल्याचं हवामान खात्याचं म्हणणं आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.