Tiranga Rally : स्वातंत्र्य दिनानिमित्त आळंदीत तिरंगा रॅली

एमपीसी न्यूज – 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिनाचे 76 व्या वर्धापन दिनानिमित्त आळंदीत तिरंगा रॅली (Tiranga Rally) आळंदीतील विविध सेवा भावी संस्था यांचे वतीने उत्साहात झाली.

आळंदी येथील वारकरी शिक्षण संस्था येथील चौकातून बाईक रॅली (Tiranga Rally) आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांचे हस्ते श्रीफळ वाढवून सुरू करण्यात आली. यावेळी वाहतूक पोलीस शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश नांदुरकर, रॅली मुख्य संयोजक आळंदी जनहित फाऊंडेशन कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, अध्यक्ष राजेंद्र घुंडरे,  राहुल चव्हाण, नेचर फाऊंडेशन अध्यक्ष भागवत काटकर, पोलिस मित्र युवा महासंघ प्रवीण बोबडे, महिला विंग प्रदेश अध्यक्षा ज्योती पाटील, पोलिस मित्र वेल्फेअर असोसिएशन अध्यक्ष शिवाजी जाधव, उदय काळे, किरण कोल्हे, यशवंत संघर्ष सेनेचे अध्यक्ष विष्णू कुऱ्हाडे, आळंदी एल्गार सेना शहर अध्यक्ष बाळासाहेब कवळासे, दक्षता सेवा फाऊंडेशन अध्यक्ष किरण नरके पोलीस हवालदार मच्छिंद्र शेंडे आदी उपस्थित होते.

Alandi : महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेत आळंदीचा तेजस काळे राज्य गुणवत्ता यादीत

प्रदक्षिणा मार्गाने रॅली (Tiranga Rally) अधिकमास अखंड हरिनाम सप्ताह आळंदी सिद्धबेट येथे आली. येथे पोलिस मित्र, नागरिक, सेवाभावी संस्था पदाधिकारी यांचे आरोग्याची तपासणी उपचार मार्गदर्शन पोलीस मित्र युवा महासंघा तर्फे उत्साहात करण्यात आले. यावेळी रॅली समारोपात प्लॅटिक वापर टाळा, कागदी व कापडी पिशव्या वापरण्याचे आवाहन गणेश गरुड यांनी केले.याबाबत माहिती अर्जुन मेदनकर यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.