Pune : पुण्यासाठी लवकरच स्वतंत्र डॉप्लर रडार

एमपीसी न्यूज – स्थानिक हवामान अंदाज अधिक अचूक आणि वेगवानरित्या वर्तविण्याच्या दृष्टीने पुणे शहरासाठी स्वतंत्र डॉप्लर रडार मंजूर झाले आहे. (Pune) त्यासाठी जागा निश्चित करण्याबाबतची कार्यवाही सुरू आहे. या रडारमुळे ‘नाऊकास्ट’ नुसार आगामी दोन तीन तासातील अचूक अंदाज वर्तवणे शक्य होणार आहे, अशी माहिती  भारतीय हवामानशास्त्र विभाग पुणेचे प्रमुख के. एस. होसळीकर यांनी दिली.

एल निनो समुद्र प्रवाह आणि हवामान बदलाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी होसळीकर बोलत होते. पुणे शहरात सध्या पुणे, पाषाण, लोहगाव, चिंचवड, लवळे, मगरपट्टा या सहा ठिकाणी रिअल टाइम तापमान व हवामान स्थितीविषयक माहिती जमा करण्याची व्यवस्था असून ही माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असेही होसळीकर म्हणाले.

Pimpri : अग्निशमन विभागाचे दिवसभरात दोन ठिकाणी मॉकड्रिल

अनुपम कश्यपी यांनी विभागाकडील हवामान अंदाज, इशारे, त्याचे प्रकार, चिन्हांचे अर्थ आदींबाबत माहिती दिली. पुणे शहर व परिसरासाठी विभागाकडून स्थानिक अंदाज व हवामान (Pune) सल्ला जाहीर करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे महानगरपालिका यांच्या सहकार्याने पुणे शहरात 160 ठिकाणी इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले बोर्डवर हवामानाची माहिती दर्शविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. चटोपाध्याय यांनी उष्णतेची लाट आणि हवामान प्रारुपांचा आरोग्य क्षेत्रासाठी उपयोग याबाबत माहिती दिली. मलेरिया, डेंग्यू सारख्या साथीचा पूर्वानुमानासाठी या प्रारुपांचा उपयोग होऊ शकतो.(Pune) आरोग्य विभाग आणि हवामानशास्त्र विभागाने समन्वयाने काम केल्यास याविषयी गतीने उपाययोजना करता येतील, असे यावेळी सांगण्यात आले.

यावेळी हवामानशास्त्र विभागाचे मुंबई प्रादेशिक कार्यालयाचे संकेतस्थळ https://mausam.imd.gov.in/mumbai/, भारतीय हवामानशास्त्र विभागाचे https://mausam.imd.gov.in/ तसेच पुणे https://www.imdpune.gov.in/marathi/indexmarathi.php  या संकेतस्थळ तसेच विभागाचे ‘मौसम’ ॲप, वीजांबाबत माहिती देणारे ‘दामिनी’ ॲप आदी मोबाईल ॲपचा उपयोग करण्याबाबत माहिती देण्यात आली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.