Pimpri : उद्यानांची दुरुस्तीची कामे तातडीने करा, अतिरिक्त आयुक्तांचे निर्देश

एमपीसी न्यूज – उद्यानांमध्ये स्वच्छता ठेवणे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे, नामफलक लावणे, देखभाल दुरुस्ती विषयक कामे तातडीने करण्याच्या सूचना अतिरिक्त (Pimpri) आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी उद्यान निरिक्षक व संबधित उद्यानाचे कामकाज पाहणा-या ठेकेदारांना दिल्या.

अ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणा-या महानगरपालिकेच्या गणेश विजन आकुर्डी उद्यान, श्री संत ज्ञानेश्वर उद्यान, स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान गणेश तलाव, श्री स्वामी समर्थ उद्यान तसेच स्पाईन रोड मधील दुभाजक येथील उद्यान विषयक कामकाजाची पाहणी आज अतिरक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील व उद्यान विभागाचे विभाग प्रमुख रविकिरण किरण घोडके यांनी केली त्यावेळी त्यांनी संबंधितांना सूचना दिल्या.

यावेळी अ क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे, उद्यान अधिक्षक गोरक्ष गोसावी, कार्यकारी अभियंता रविंद्र पवार आदी उपस्थित होते. सकाळी 9 वाजता अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील आणि घोडके यांनी महानगरपालिकेच्या उद्यानांना अचानक भेटी देऊन तेथील सुविधांचा आढावा घेतला. (Pimpri) यावेळीस्पाईन रोड मध्य दुभाजक रस्त्यांवर नवीन शोभिवंत झाडे लावणे व पाण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना संबंधित अधिका-यांना दिल्या.

Pune : पुण्यासाठी लवकरच स्वतंत्र डॉप्लर रडार

गणेश विजन आकुर्डी उद्यान येथे भेट देऊन तेथील बागेच्या नावाचे फलक लावणे, कंपाऊंडची लोखंडी ग्रील तयार करणे, नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे, शौचालयाची स्वच्छता राखणे व साईन बोर्ड लावणे. श्री संत ज्ञानेश्वर उद्यान येथील पाण्याच्या टाकीवरील साफसफाई करणे, (Pimpri) सावलीच्या ठिकाणी इंनडोअर झाडे लावणे, म्युरल आर्ट करिता नियोजन करणे तसेच नवीन उद्यानाचा आराखडा तयार करणे, गणेश तलावामधील गाळ काढणे, उद्यानातील सावलीच्या ठिकाणी व मोकळ्या जागेवर पावसाळ्यात लॉंन विकसित करणे, श्री स्वामी समर्थ उद्यान येथे भेट दिली असता उद्यानामध्ये श्री स्वामी समर्थ यांचे मंदिर असल्याने भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे तसेच लॉंन विकसित करून शोभिवंत झाडांची लागवड करण्याबाबतच्या सूचना अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी यावेळी दिल्या.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.