Pimpri: दिवसभरात कोरोनाचे दोन बळी; मृतांमध्ये सांगवीतील 70 वर्षीय वृद्धाचा समावेश

Two victims of corona throughout the day; The dead included a 70-year-old man from Sangvi

बळींची संख्या पोहचली 19 वर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना बाधित दोघांचे आज (गुरुवारी) एकाचदिवशी मृत्यू झाले आहेत. सांगवीतील 70 वर्षीय वृद्धाचा सायंकाळी मृत्यू झाला आहे. तर, दुपारी गोलखेलनगर येथील रुग्णाचा वायसीएमएचमध्ये मृत्यू झाला होता. महापालिका हद्दीबाहेरील 11, तर शहरातील 8 अशा 19 जणांचा आजपर्यंत कोरोनाने बळी घेतला आहे.

सांगवी परिसरातील वृद्धाला कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान आज त्यांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, 12 एप्रिल रोजी थेरगाव भागातील एका पुरुषाचा, 20 एप्रिल रोजी निगडीतील एका महिलेचा आणि पुण्यातील रहिवाशी पण वायसीएममध्ये दाखल असलेल्या एका महिलेचा,  24 एप्रिल रोजी  निगडीतील एका पुरुष रुग्णाचा, 29 एप्रिल रोजी खडकीतील एका महिलेचा, 6 मे रोजी पुण्यातील शिवाजीनगर येथील महिलेचा कोरोनाने बळी घेतला आहे.

तसेच येरवडा येथील एका महिलेचा  वायसीएम रुग्णालयात,  भोसरीतील पुरुष रुग्णाचा 10 मे रोजी, 11 मे रोजी पुण्यातील वायसीएममध्ये उपचार घेत असलेल्या पुरुष रुग्णाचा आणि 15 मे रोजी पुण्यातील वायसीएममध्ये उपचार घेत असलेल्या तिघांचा  मृत्यू झाला होता.

तर  19 मे रोजी भोसरीतील दोघांचा आणि 19 मे रोजीच रात्री उशिरा येरवड्यातील एका पुरुष आणि 20 मे रोजी खराळवाडीतील एका महिलेचा,   25 मे रोजी येरवड्यातील एका महिलेचा आणि आज 28 मे रोजी पुण्यातील एकाचा आणि सांगवीतील एकाचा अशा 19 जणांचा कोरोनामुळे आजपर्यंत मृत्यू झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.