Moshi : जमीन विक्रीच्या बहाण्याने 27 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – जमीन विक्रीच्या बहाण्याने दोघांनी एका (Moshi) व्यक्तीची 27 लाख रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार डिसेंबर 2021 ते 28 जून 2023 या कालावधीत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोशी येथे घडला.

रुपेश वासुदेव नाईकरे (वय 34, रा. मोशी) यांनी याप्रकरणी बुधवारी (दि. 3) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मनोज सरायनाथ रॉय (वय 48, रा. पिंपरी), अशोक सखाराम टाकसाळ (वय 41, रा. संत नगर, मोशी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nigdi : मुंबई ते कर्नाटक माल पोहोचवण्याच्या बहाण्याने साडेचार लाखांची फसवणूक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांना मोशी येथील दोन जागा एक कोटी रुपयांना देतो असे सांगितले. त्यानुसार फिर्यादीकडून इसार म्हणून 30 लाख रुपये घेतले. त्यानंतर समजुतीचा करारनामा केला. करारनाम्याप्रमाणे आरोपींनी खरेदीखत करून (Moshi) दिले नाही. दरम्यान आरोपी हे फिर्यादी यांना 27 लाख रुपये देणे होते. ते पैसे परत न करता त्यांची आरोपींनी फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.