Moshi Accident : मोशी येथे पिकअपच्या धडकेत महिला जखमी

एमपीसी न्यूज – दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेला भरधाव पिकअपने (Moshi Accident) धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार महिला गंभीर जखमी झाली. ही घटना मंगळवारी (दि. 27) सायंकाळी हवालदार वस्ती चौक, मोशी येथे घडली.

याप्रकरणी राहुल सुदाम आल्हाट (वय 36, रा. मोशी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिरण्यात दिली आहे. त्यानुसार अज्ञात पिकअप चालकाच्या विरोधात (Moshi Accident) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास फिर्यादी यांच्या वहिनी त्यांच्या दुचाकीवरून जात होत्या. त्या हवालदार वस्ती येथे आल्या असता त्यांच्या दुचाकीला भरधाव पिकअपने पाठीमागून धडक दिली.

Online Fraud : क्रेडिट कार्डवर रिवॉर्ड मिळाल्याचे सांगत 34 हजारांचा ऑनलाईन गंडा

अपघात घडल्यानंतर आरोपी पिकअप चालक घटनास्थळी न थांबता तसेच पोलिसांना माहिती न देता पळून गेला. यात फिर्यादी यांच्या वहिनी गंभीर जखमी झाल्या. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.