Moshi Crime News : परदेशात विकण्यासाठी शेतमाल घेऊन 85 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – परदेशात विकण्यासाठी मोशी येथील एकाकडून शेतीमाल खरेदी केला. एक महिन्यात मालाचे पैसे देण्याचे ठरवले. मात्र दिलेल्या मुदतीत पैसे न देता 85 लाख 11 हजार रुपयांची फसवणूक केली. प्रकार 18 सप्टेंबर 2019 ते 30 ऑक्टोबर 2019 या कालावधीत मोशी प्राधिकरण येथे घडला.

कमलेश कनन नायर (वय 63, रा. शास्त्रीनगर, येरवडा, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत संदीप शंकरराव खंडागळे (वय 47, रा. मोशी प्राधिकरण) यांनी बुधवारी (दि. 25) ऑगस्ट रोजी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांचा शेतीमाल खरेदी करून परदेशात विक्री करून त्याचे पैसे परत देण्याचा करार केला. त्यानुसार फिर्यादी यांच्याकडून 85 लाख 11 हजार 569 रुपयांचा शेतीमाल विकत घेतला. तो माल पुढे परदेशात विकला. मात्र ठरल्या प्रमाणे फिर्यादी यांना 30 दिवसात घेतलेल्या मालाचे पैसे दिले नाहीत.

त्यानंतर आरोपीने पैसे देण्यासाठी चेक देण्याचा बहाणा केला. त्याच्या बँक खात्यात पैसे नसल्याने फिर्यादी यांचा चेक वटला नाही. त्यानंतरही फिर्यादी पैसे मागण्यासाठी गेले असता आरोपीने त्यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची, हातपाय तोडण्याची धमकी देऊन फसवणूक करत शेतमालाचा अपहार केला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.