Moshi Fire Incident : मोशीमध्ये दोन स्मॅाल स्केल कंपन्यांना आग

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवडमधील मोशी येथून (Moshi Fire Incident) मोठी बातमी समोर आली आहे. मोशीमधील दोन स्मॅाल स्केल कंपन्यांना आग लागली आहे. सकाळी सातच्या सुमारास ही आग लागली असून घटनास्थळी अग्निशमन दलाचे पाच बंब हजर झाले आहेत. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. 

Agneepath : तरुणांचा विरोध पाहता ‘अग्निपथ’च्या वयोमर्यादेत वाढ

मोशीमधील जय गणेश साम्राज्य चौक येथील गंधर्व नगरी शेजारी दोन स्मॅाल स्केल कंपन्यांना आग लागली. एक सिलेंडर पत्रा फुटून सुमारे दोनशे फुट उडाला तर दोन दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. अद्याप कोणतीही जीवितहानी समोर आलेली नाही. तसेच, आगीचे (Moshi Fire Incident) कारण अजून समजू शकलेले नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.