Moshi : एमआयसीडीसीमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग; एकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – घरासमोर शतपावली करीत असलेल्या अल्पवयीन मुलीचा हात धरून तिचा विनयभंग करण्यात आला. ही घटना बुधवारी (दि. 6) रात्री साडेदहाच्या सुमारास मोशी परिसरात घडली.

  • याप्रकरणी 16 वर्षीय अल्पवयीन मुलीने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार वैभव कांबळे (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्रीचे जेवण झाल्यानंतर पीडित मुलगी घरासमोर शतपावली करीत होती. यावेळी तिच्यासोबत तिची एक मैत्रीण आणि भाऊ देखील होता. दरम्यान, त्याठिकाणी आलेल्या आरोपी कांबळे याने तिचा विनयभंग केला. पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.