Moshi : पूर्ववैमनस्यातून तरुणावर जीवघेणा हल्ला दोघांना अटक

एमपीसी न्यूज – पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून तिघांनी मिळून तरुणावर जीवघेणा हल्ला केला. डोळ्यात मिरची पूड टाकून त्याच्यावर कोयत्याने वार केले. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी दुपारी साडेचारच्या सुमारास मोशी भाजी मार्केट जवळ घडली. एमआयडीसी भोसरी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

अक्षय उर्फ टकल्या सुदाम गायकवाड वय 20, शुभम बाळू खरात वय 21, दोघे रा. गांधीनगर मोशी अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. तर इस्तियाक खान हा आरोपी अद्याप फरार आहे. याप्रकरणी विशाल विश्वनाथ शिनगारे वय 28, रा. मोशी यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल यांचा भाचा शुभम आणि आरोपींचे मागील काही दिवसांपूर्वी भांडण झाले. त्या भांडणाचा राग मनात धरून रविवारी दुपारी आरोपींनी रिक्षा हळू चालविण्याच्या कारणावरून शुभम शी भांडण केले. शुभमच्या डोळ्यात मिरची पूड टाकून त्याच्यावर कोयत्याने वार केले. यामध्ये शुभम गंभीर जखमी झाला. भोसरी पोलिसांनी या प्रकरणात दोघांना अटक केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.