Moshi : ‘त्या’ जागेबाबत गावक-यांनी दिली शासनाला पंधरा दिवसांची मुदत

एमपीसी न्यूज – मोशी येथील नियोजित सफारी पार्कची आरक्षित जागेबाबाबत पुणे महानरगरपालिकेने स्वतंत्र कचरा डेपोसाठी राज्य शासनाकडे मागणी केली आहे. महसुल व वनविभागाने याबाबत प्रस्ताव तयार केला असून शासनाकडे प्रलंबित आहे. जर या प्रस्तावास शासनाची मंजुरी मिळाली तर गावबंद आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा आज घेण्यात आलेल्या गावबंद आंदोलनात गावक-यांनी दिला. गावबंद आंदोलनास गावक-यांनी शंभर टक्के प्रतिसाद दिला.

मोशीतील सर्व दुकाने आज बंद ठेवण्यात आली आहे. सर्व व्यवहार बंद असून नागरिकांनी या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. वर्दळीच्यावेळी रस्त्यावर शुकशुकाट जाणवला.

  • यावेळी आमदार महेश लांडगे, माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर नितीन काळजे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, स्थानिक शरद बो-हाडे, अरुण बो-हाडे, वसंत बोराते, नगरसेविका अश्विनी जाधव, सारिका बो-हाडे, लक्ष्मण सस्ते, नगरसेविका सुवर्णा बुर्डे, बबन बोराटे, मंदा आल्हाट याचबरोबर माजी सरपंच हरिभाऊ सस्ते, माणिक सस्ते, दिलीप बो-हाडे, राहूल बनकर, अशोक गोखले आदी व ग्रामस्थ उपस्थित होते.

आमदार महेश लांडगे म्हणाले की, आता पुणे पालिका त्यांचा कचरा टाकण्यासाठी सफारी पार्क आणि खदानची जागा भाडे तत्वावर मागत आहे. हे अन्यायकारक आहे. चरहोली, मोशी, डुडळगाव, या भागाचे शहरीकरण होत आहे. मोठमोठे गृह प्रकल्प उभे राहत आहेत. शेतकरीही जागा न विकता काही व्यवसाय करत आहेत. या परिस्थितीत पुण्यातील कचरा मोशीत आणल्यास पिंपरी-चिंचवडचा कचराही इथे येऊ देणार नाही.

  • माजी आमदार विलास लांडे म्हणाले की, मोशीतील नियोजित सफारी पार्कच्या जागेत पुण्यातील कचरा आणून टाकण्यास शासने मंजुरी दिल्यास पिंपरी-चिंचवडचा कचराही मोशीत येऊ देणार नाही .

यावेळी लक्ष्मण सस्ते म्हणाले की, आधीच मोशी कचरा डेपोमुळे येथील ग्रामस्थांना दुर्गंधीचा त्रास होत आहे. आरोग्याच्या तक्रारी होत आहेत. त्यात पुण्यातील कचरा इथे आणून टाकणे भयंकर आहे.

  • नगरसेवक वसंत बो-हाटे म्हणाले, इथे श्रेयवाद नाही. सर्वच ग्रामस्थांचा पुण्यातील कचरा इथे आणून टाकण्यास विरोध आहे.

मोशीतील लोक काय जनावरे आहेत का? असा प्रश्न माजी सरपंच हरिभाऊ सस्ते यांनी उपस्थित केला आहे.

अरुण बो-हाडे म्हणाले की, शहराची लोकसंख्या सीमित होती, तेव्हा कचरा डेपो मोशीत सुरू झाला. 2003 च्या सुमारास शहरीकरण वेगाने होत असताना मोशीप्रमाणेच पुनवळे येथील जागेत कचरा डेपो करावा, असा प्रस्ताव तयार केला. मात्र, पुनावले येथील नागरिकांचा त्यास विरोध असल्याने शहराचा सगळा कचरा मोशी डेपोत आणून टाकला जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.