BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : नाट्यसिंधुतर्फे कोकणात मनोरंजन; 12 प्रयोग सादर

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळ, थेरगाव चिंचवडच्या वतीने ‘कोकण भागात पाहुणे आले रे…’ , ‘विठाबाईचा कावळा’ या दोन एकांकिकाता नाट्यदौरा पार पडला. एकूण 35 कलाकारांसह त्याचे 12 प्रयोग सादर करण्यात आले.

उन्हाळी सुटीमध्ये कोकणैत पुण्या-मुंबईहून मोठ्या संख्येने चाकरमानी गावाला आलेले असतात. याच काळात गावामध्ये वार्षिक सार्वजनिक महापूजा होतात. मनोरंजनाकरिता विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. कोकणातील काही शाळांच्या मदतीकरिता नाट्यप्रयोग सादर केले गेले.

  • सावंतवाडी येथील आंबोली, पारपोली, चौकुळ, कारीवडे, मालवण येथील पेंडुर तसेच आमडोस येथील भैरवनाथ मंदिर येथे नाट्यप्रयोग झाले. सिंधुदुर्रग जिल्हा उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष अजय पाताडे, दिग्दर्शक राजेश कांडर, मंडळाचे संस्थापक सदस्य अरविंद पालव, प्रमोद राणे, रंगकर्मी बाळा जुवाटकर, सचिव अड. चंद्रकांत गायकवाड, खजिनदार धर्मराज सावंत, चंद्रकांत नाईक, यशवंत गावडे, दिपक मिस्त्री, प्रसाद मिस्त्री, संतोष गावडे, स्वाती गावडे, सुलभा नाईक, विद्या मिस्त्री, सुनील गायकवाड, नंदकिशोर सावंत, बाळकृष्ण नाईक, श्रध्दा मिस्त्री, बालकलाकार श्रावणी मिस्त्री, विशाल गावडे आणि बाळकृष्ण गुरव यांनी सहभाग घेतला.

HB_POST_END_FTR-A2

.