Pimpri News: राज्य शासनाच्या सिंगल युज प्लॅस्टिकच्या वापराबाबत नियम शिथिल करण्याला बहुतांश पर्यावरण संस्थांचा विरोध

एमपीसी न्यूज : राज्य शासनाच्या सिंगल युज प्लॅस्टिकच्या वापराबाबत नियम शिथिल केल्याचा प्लास्टिक उद्योगाने स्वागत केले तर पर्यावरण संस्थांनी त्याचा पर्यावरणावर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली आहे.

प्लॅस्टिक उद्योगावर सध्याच्या नियमांमुळे विपरीत परिणाम झाला आहे. काही उद्योग बंद झालेत व बेरोजगारी वाढीली आहे. या कारणा मुळे राज्य शासनाने सिंगल यूज प्लॅस्टिकचे वापराबाबत नियम शिथिल केले आहेत. त्यासंदर्भात अधिसूचना काढण्यात आली आहे.

याविषयी विचारले असता, योगेश बाबर, अध्यक्ष, पिंपरी चिंचवड प्लॅस्टिक असोसिएशन म्हणाले की,” आता 75 जीएसएम च्या वरील जाडीचा प्लॅस्टिकचा वापर कप, द्रोण, पत्रावळी, स्ट्रॉ, काटे, चमचे, ग्लासेस, भांडे, कन्टेनर ई अशा वस्तू बनवत आहेत. यामुळे उत्पादन खर्च जास्त असल्याने त्या जास्त प्रमाणात बनवत नसत कारण त्यांची विक्रि किंमत जास्त असल्याने लोक कमी वापरतात. पण नवीन नियमानुसार आता या वस्तूसाठी 60 जीएसएम च्या वरील जाडीचा प्लॅस्टिकचा वापर कर्ता येणार असल्याने उत्पादन खर्च कमी होईल तसेचा विक्री किंमत कमी असल्याने लोक त्या जास्त वापरू शकतील. ह्या वस्तू आता रेस्टॉरंट्स , हॉटेल्स, ढाबे, डब्बे वाले व इतर व्हायसायात यांचा वापर वाढेल.

पॅकेजिंग मटेरियल साठी आता 75 मायक्रोन पेक्षा जास्त जाड प्लॅस्टिक वापरावे लागते त्यामुळे पॅकेजिंग चा खर्च जास्त आहे. पण नवीन नियमानुसार 50 मायक्रोन पेक्षा जास्त जाड प्लॅस्टिक वापरत येईल. त्यामुळे पॅकेजिंग साठी प्लॅस्टिक चा वापर वाढेल. त्यामुळे नवीन नियमांमुळे प्लॅस्टिक उद्योगांना लाभ होईल.”

Pimpri News: संदीप वाघेरे यांच्या वतीने इंटरव्ह्यू स्टेशन सुरु

जलबिरादरीचे नरेंद्र चुघ म्हणाले की,” या नवीन निर्णयामुळे प्लॅस्टिक उद्योगाला लाभ होईल पण समाजाचा तोटा होईल. या नवीन नियमांमुळे प्लॅस्टिकचा कचरा वाढणार, नदी, नाले व समुद्रांचे प्रदूषण वाढणार. आपल्याकडे कचऱ्याचे व्यवस्थापन नीट होत नाही. प्लॅस्टिक वापरावर पुर्ण बंदी घातली पाहिजे. परदेशात खास करून युरोप मध्ये जसे पर्यावरणवादी पक्ष सत्तेत असतात त्यामुळे तेथील सर्व प्रदूषणकरणारे उद्योग चीन मध्ये गेलेत. तसे आपल्या देशात पण पर्यावरण रक्षणासाठी पर्यावरणवादी पक्ष सत्तेत आले पाहिजेत.”

एनविरोनमेंट कंजेर्वेशन असोसिएशनचे शिकंदर घोडके यांनी या शासन निर्णयाचा निषेध केला आहे. ते म्हणाले की,”प्लॅस्टिकचा वापर कप, द्रोण, पत्रावळी, स्ट्रॉ, काटे, चमचे, ग्लासेस, भांडे, कन्टेनर ई. अशा वस्तू बनवण्यासाठी करू नये. या प्लॅस्टिकच्या वस्तू लोक कुठेही फेकतात त्यामुळे कचरा वाढतो. या वस्तूंमध्ये लोक अन्न फेकत असल्यामुळे भटकी जनावरे ते खातात व ते दगावतात. त्यामुळे या वस्तू स्टीच्या बनवल्या पाहिजेत जे वारंवार वापरता येतात.

तसेच प्लॅस्टिकचा वापर पॅकेजींग साठी वाढला तर लोक ते पॅकेजींग कचऱ्यात फेकणार. त्यामुळे प्लॅस्टिकचा कचरा वाढणार. त्यामुळे जास्त कचरा डेपोत लागतील तो टाकण्यासाठी. तसेच लोक प्लॅस्टिक पॅकेजिंग मटेरिअल हा कचरा असल्याने त्याचा वापर शेकोटी करण्यासाठी वापरतील जसे आता ते रबर टायर वापरतात व त्यामुळे वायू प्रदूषण वाढेल.”

जलदिंडीचे राजीव भावसार म्हणाले की, “पर्यावरण बदल टाळण्यासाठी व पर्यावरण वाचवण्यासाठी प्लॅस्टिकचा वापर कमीत कमी केला पाहिजे. पण नवीन नियमांमुळे प्लास्टिकचा वापर वाढेल. त्यामुळे कचरा वाढेल.”

गणेश बोरा, अध्यक्ष, रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी म्हणाले की,”पूर्वी हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, लग्न व इतर समारंभात स्टीलचे काटे, चमचे, ग्लासेस, भांडे, कन्टेनर, प्लेट्स ई वापरत होते. प्लॅस्टिक बंदीमुळे प्लॅस्टिक पासून बनवलेले कप, द्रोण, पत्रावळी, स्ट्रॉ, काटे, चमचे, ग्लासेस, भांडे, कन्टेनर कमी वापरले जात होते. पण नवीन नियमांमुळे प्लॅस्टिक पासून बनवलेले कप, द्रोण, पत्रावळी, स्ट्रॉ, काटे, चमचे, ग्लासेस, भांडे, कन्टेनर ई. अशा ई. यांचा वापर वाढेल. त्यामुळे कचरा वाढेल. पर्यावरणाचा ऱ्हास वाढेल.”

धनंजय शेडबाळे, विश्वस्त, देवराई फौंडेशन व सावरकर मंडळाच्या निसर्गमित्र विभागाचे अध्यक्ष म्हणाले की,” नवीन नियमांमुळे प्लॅस्टिकचा वापर वाढेल. त्यामुळे कचरा वाढेल. हा कचरा लोक इतरत्र फेकल्यामुळे नदी, नाले, समुद्राचे प्रदूषण वाढेल.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.