Talegaon Dabhade : इंद्रायणी महाविद्यालयात तालुकास्तरीय व्हॉलीबाॅल स्पर्धेचे आयोजन

एमपीसी न्युज – इंद्रायणी महाविद्यालयात तालुकास्तरीय व्हॉलीबाॅल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे यांच्या हस्ते होणार आहे. दोन वयोगटात २३ संघांनी नोंदणी केली आहे.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य,पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे व इंद्रायणी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार (दि ४) रोजी तालुकास्तरीय व्हॉलीबाॅल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

Maval : जिल्हा परिषद शाळांना आयटी कंपनीकडून 140 संगणक भेट

इंद्रायणी महाविद्यालयात या स्पर्धा होणार आहेत.स्पर्धेचे उदघाटन इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे अध्यक्ष व सुप्रसिद्ध उद्योजक रामदासजी काकडे यांच्या शुभहस्ते सकाळी ९ वा. होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून कार्यवाह चंद्रकांत शेटे उपस्थित राहाणार आहेत अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संभाजी मलघे यांनी दिली.

या स्पर्धेत १७ वर्षीय मुलांच्या गटात १३ संघांनी तर १९ वर्षीय मुलांच्या गटात १० संघांनी सहभाग नोंदविला असून मोठ्या प्रमाणावर संघांनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदविण्याचे आवाहन इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे विश्वस्त संदीप काकडे यांनी केले. इंद्रायणी महाविद्यालयाच्या भव्य नूतन क्रीडांगणावर या स्पर्धा पार पाडण्यास इंद्रायणी महाविद्यालय सज्ज असल्याची माहितीही काकडे यांनी सूत्रांना दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.