गुरूवार, डिसेंबर 8, 2022

Jitendra Wagh : माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ या अभियानाचा महिलांनी लाभ घ्यावा – जितेंद्र वाघ

एमपीसी न्यूज : स्त्रियांचे आरोग्य सुदृढ असेल तर सर्व कुटुंबाचे पर्यायाने समाजाचे आरोग्य सुदृढ राहील. स्त्रियांचे आरोग्य संवर्धन करण्यासाठी तसेच स्त्री शक्तीचा सन्मान करण्यासाठी महापालिकेच्या वतीने नवरात्र उत्सवा निमित्त अयोजित करण्यात आलेल्या माता सुरक्षित तर घर सुरक्षितया (Jitendra Wagh) अभियानामध्ये 18 वर्षे वयोगटावरील सर्व महिला, माता, गरोदर महिलांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन आपली आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी केले.

महापालिकेच्या वतीने राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या सूचनांनुसार नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ हे अभियान दि.26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर 2022 या कालावधीत राबविण्यात येत आहे. या अभियानाचा शुभारंभ महापालिकेच्या नवीन थेरगाव रुग्णालयात अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांच्या उपस्थितीत करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.(Jitendra Wagh) यावेळी अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.पवन साळवे, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, डॉ.राजेंद्र मंडपे, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, उप आयुक्त रविकिरण घोडके, वैद्यकीय अधिकारी डॉ. आसावरी ढवळे, डॉ. चैताली इंगळे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी, परिचारिका, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ या अभियाना अंतर्गत 18 वर्षे वयोगटावरील सर्व महिला, माता, गरोदर महिला यांची सर्वांगीण तपासणी करण्यात येत आहे. तसेच प्रतिबंधात्मक व उपचारात्मक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. महिलांच्या सुरक्षित व सुदृढ आरोग्यासाठी समुपदेशन सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. आवश्यकतेनुसार रुगणालय, अंगणवाडी स्तरावर उपचार उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. महापालिकेच्या दवाखाना, रूग्णालयांच्या कार्यक्षेत्रामधील विविध झोपडपट्टी, अतिजोखमिचा भाग अशा ठिकाणी महिला व मातांच्या तपासणीसाठी बाह्यसंपर्क तपासणी शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत.

Alandi News : आळंदीत माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान

या शिबिरांमध्ये औषेधोपचार मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच सर्व रुग्णालयांमध्ये अॅनिमिया मुक्त कॉर्नरमध्ये रुग्णांचे समुपदेशन करण्यात येणार आहे. रुग्णालय स्तरावर विशेष सोनोग्राफी शिबिरांचे आयोजन करून जास्तीत जास्त गरोदर मातांची तपासणी करण्यात येणार आहे. (Jitendra wagh) ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ या अभियान कालावधीमध्ये महापालिकेचे दवाखाने, रुग्णालये येथे सोनोग्राफी, एक्स-रे, सेवा, समुपदेशन, औषधोपचार आदी सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी सांगितले.

महिला सर्व कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेतात, त्यांचे स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असते, त्यांचे आरोग्य सुरक्षित राहण्यासाठी महापालिकेच्या वतीने वेळोवेळी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात.(Jitendra Wagh) महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे देखील लक्ष देणे गरजेचे आहे, असे मत ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी तथा महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे यांनी माडले.

Latest news
Related news