Alandi News : आळंदीत माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान

एमपीसी न्यूज :  राज्य सरकारकडून या नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं महिलांसाठी एक खास अभियान राबवलं जाणार आहे.(Alandi News) राज्याच्या आरोग्य विभागामार्फत माता सुरक्षित तर घर सुरक्षित हे विशेष अभियान राबवलं जात आहे. या अभियानात महाराष्ट्रातील सर्व महिलांची मोफत आरोग्य तपासणी केली जाणार आहे.

या अभियानाचे 27 सप्टेंबर मंगळवार रोजी आमदार दिलीप अण्णा मोहिते पा. यांच्या हस्ते आळंदी ग्रामीण रुग्णालयात उद्घाटन झाले.त्यांच्या व उपस्थितांच्या हस्ते  दीपप्रज्वलन करण्यात आले. या कार्यक्रमा दरम्यान 2 मुलीच्या जन्माचे स्वागत म्हणून आमदारांच्या हस्ते त्या लहान मुलींच्या मातेंचा सत्कार करण्यात आला. तसेच आमदारांनी आळंदी ग्रामीण रुग्णालयाची संपूर्ण पाहाणी केली. रुग्णालयातील स्वच्छतेपासून इतर विविध आरोग्य सेवां अडीअडचणी बाबत आळंदी ग्रामीण रुग्णालयातील अधीक्षकांना विचारपूस करून संबंधित आधिकाऱ्याला त्याबाबत संपर्क करण्यात आला.

Pimpri Corona Update : शहरात आज 51 नवीन रुग्णांची नोंद; 40 जणांना डिस्चार्ज

यावेळी ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ. उर्मिला शिंदे यांनी महिन्या दिड महिन्यात नव्यानेच आळंदी रुग्णालयातील कार्यभार स्वीकारला आहे.(Alandi News) यावेळी त्या म्हणाल्या ग्रामीण रुग्णालयातील काही त्रुटीं वर येणाऱ्या काही दिवसांमध्ये काम केले जाईल.व आळंदी ग्रामीण रुग्णालयात आरोग्य सेवे साठी  मनुष्यबळ कमी असल्याने विविध त्रुटी निर्माण होत आहेत.

यावेळी आळंदी राष्ट्रवादी चे नेते डी डी भोसले पा.सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब चौधरी, कविता मॅडम व आळंदी ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी वर्ग  इ.मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमा नंतर ग्रामीण रुग्णालयातील अधीक्षक यांचे डी डी भोसले पा. यांसकडून कामाचे कौतुक करण्यात आले.(Alandi News) कार्यभार स्वीकारून महिना दीड महिना झाला असून सुद्धा ग्रामीण रुग्णालयात बराचसा फरक जाणवत आहे असे यावेळी ते म्हणाले. माता सुरक्षित तर घर सुरक्षित या अभियानाद्वारे 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर पर्यंत आळंदी ग्रामीण रुग्णालयात विविध शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.