MPC News Kala Samwad : एमपीसी न्यूज कला संवाद शुभारंभाच्या निमित्ताने जमली कला क्षेत्रातील मान्यवरांची मांदियाळी (फोटो फिचर)

एमपीसी न्यूज – मागील 13 वर्षांपासून पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना दैनंदिन घडामोडींचे ताजे अपडेट्स देणा-या शहरातील पहिल्या आणि अग्रगण्य ‘एमपीसी न्यूज’ (mpcnews.in) या पोर्टलने शिक्षण संवादानंतर आता ‘कला संवाद’ उपक्रम हाती घेतला आहे. शहरातील तसेच राज्यातील कलाकारांना ‘एमपीसी न्यूज कला संवाद’ या उपक्रमाच्या माध्यमातून मोठे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. या उपक्रमाचा शुभारंभ विविध मान्यवरांच्या हस्ते आज (सोमवारी) मोठ्या दिमाखात संपन्न झाला.

चिंचवड येथील ‘एमपीसी न्यूज’च्या कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला. कलेची देवता नटराजाची पूजा करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर, अप्पूघरचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजेश मेहता, कलारंग कला प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अमित गोरखे, तळेगाव दाभाडे येथील कलापिनीचे विश्वस्त डॉ. अनंत परांजपे, नामवंत अभिनेते – दिग्दर्शक डॉ. संजीवकुमार पाटील, ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक व अभिनेते अनिरुद्ध खुटवड, नामवंत नृत्यांगना तेजश्री अडिगे, महाराष्ट्र कलोपासक मंडळाचे विश्वस्त शंकर उणेचा, साहित्यीक श्रीकांत चौगुले, नगरसेवक अमित गावडे, छायाचित्रकार देवदत्त कशाळीकर, एमपीसी न्यूजचे संपादक विवेक इनामदार, कार्यकारी संपादक हृषीकेश तपशाळकर, सहयोगी संपादक अनिल कातळे, फिचर्स आणि संशोधन व विकास (आर अँड डी) विभागाचे संपादक राजन वडके आदी उपस्थित होते.

Pimpri News : ‘एमपीसी न्यूज कला संवाद’ उपक्रमाचा मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात शुभारंभ

भाऊसाहेब भोईर
डॉ. राजेश मेहता
डॉ. अनंत परांजपे
अमित गोरखे

अनिरुद्ध खुटवड

डॉ. संजीवकुमार पाटील
तेजश्री अडिगे
शंकर उणेचा
देवदत्त कशाळीकर
अमित गावडे
श्रीकांत चौगुले
विवेक इनामदार
अनिल कातळे
स्मिता जोशी

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.