MPC News Quiz Result 4 : ‘देवीचा जागर प्रश्नमंजुषा – दिवस चौथा… जाणून घ्या विजेत्याचे नाव!

एमपीसी न्यूज : एमपीसी न्यूज आयोजित ‘देवीचा जागर प्रश्नमंजुषा’ या ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धेला एमपीसी न्यूजच्या वाचकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. (MPC News Quiz Result 4) या स्पर्धेत दररोज एका भाग्यवान विजेत्याची निवड करण्यात येणार असून त्याला स्पर्धेचे प्रायोजक तळेगाव दाभाडे येथील ‘भगवती ज्वेलर्स’च्या वतीने एक चांदीचा कुंकवाचा करंडा बक्षीस म्हणून देण्यात येईल. तिसऱ्या दिवसाचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

या स्पर्धेत चौथ्या दिवशी एकूण 1,054 स्पर्धक सहभागी झाले. त्यापैकी 730 स्पर्धकांनी तिन्ही प्रश्नांची अचूक उत्तरे दिली. अचूक उत्तरे देणाऱ्या स्पर्धकांमधून संगणकीय सोडत पद्धतीने एका भाग्यवान विजेत्याची निवड करण्यात आली आहे.

 

चौथा दिवस – भाग्यवान विजेता (चांदीच्या दुसऱ्या करंड्याचे मानकरी)

सुजाता दिनकर निंबळे

मुक्काम – वारू, पो- पवनानगर,

ता – मावळ, जि- पुणे

 

पारितोषिक वितरण दसऱ्यानंतर चिंचवड येथे एमपीसी न्यूजच्या कार्यालयात करण्यात येईल. त्याबाबत विजेत्यांशी संपर्क साधून माहिती देण्यात येईल.

चौथ्या दिवशीही बक्षीस मिळाले नाही म्हणून नाराज होऊ नका, अजून पाच दिवस संधी आहे. नवरात्रोत्सवाच्या काळात नऊ दिवस दररोज ही प्रश्नमंजुषा चालू राहील.(MPC News Quiz Result 4) आणि हो… दिवसाचे बक्षिस मिळाले नाही तरी नऊ दिवस सर्व अचूक उत्तरे देऊन आपण महाविजेताही ठरू शकता. नऊ महाविजेत्यांची निवड देखील संगणकीय सोडत पद्धतीने करण्यात येणार आहे. या महाविजेत्यांची नावे स्पर्धेच्या शेवटी म्हणजे दसऱ्याला जाहीर करण्यात येतील.

mpcnews.in या आपल्या लोकप्रिय न्यूज पोर्टलवर गुगल फॉर्मच्या माध्यमातून दररोज तीन प्रश्न विचारण्यात येईल. तिन्ही प्रश्नांसाठी प्रत्येकी तीन पर्याय देण्यात येतील. दिलेल्या पर्यायांमधून अचूक पर्यायाची निवड करून स्पर्धकांनी फॉर्म आपले पूर्ण नाव, पत्ता व मोबाईल क्रमांक या माहितीसह सबमीट करायचा आहे.

 

प्रश्नमंजुषा प्रवेशिका भरण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

(आज दि. 30 सप्टेंबर 2022 रोजी रात्री नऊपर्यंत प्रवेशिका स्वीकारल्या जातील)

 

https://forms.gle/bCd3m5V697XDhee58

 

या तिन्ही प्रश्नांची बरोबर उत्तरे देणाऱ्या स्पर्धकांमधून सोडत पद्धतीने एका भाग्यवान विजेत्याची निवड करून भाग्यवान विजेत्याला कुंकवाचा चांदीचा करंडा बक्षीस म्हणून देण्यात येईल. या स्पर्धेचा निकाल दररोज जाहीर करण्यात येईल.

या स्पर्धेत सर्व वयोगटातील, मुले-मुली, स्त्री-पुरुष, ज्येष्ठ नागरिक सहभागी होऊ शकतात. केवळ पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातीलच नव्हे तर संपूर्ण जगभरातून कोणीही या स्पर्धेत भाग घेऊ शकतो. एकाच कुटुंबातील एक किंवा अनेक सदस्य देखील सहभागी होऊ शकतात.

 

प्रत्येक दिवसाच्या प्रश्नांची सर्व उत्तरे अचूकपणे देणारे स्पर्धकच पारितोषिकासाठी पात्र ठरतील. पात्र स्पर्धकांच्या नावांमधून सोडत पद्धतीने दररोज एका भाग्यवान विजेत्याची निवड करण्यात येईल.(MPC News Quiz Result 4) या सर्व निवड प्रक्रियेसाठी संगणक प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे.

या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी होऊन नवरात्रौत्सवात दररोज देवीचा जागर करावा, असे आवाहन भगवती ज्वेलर्सच्या वतीने करण्यात आले आहे.

स्पर्धेसाठी पत्रकार प्रभाकर तुमकर यांनी प्रश्न संकलन केले असून भीम मागाडे यांचे तांत्रिक सहाय्य लाभले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.