Talwade News : बसथांब्याजवळील उघडया डिपीमुळे होऊ शकतो जिवघेणा अपघात 

एमपीसी न्यूज- तळवडे येथे पीएमपीएलचा बस थांबा असल्यामुळे दररोज या बसथांब्यावर नागरिकांची गर्दी होते.  या परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून उघडया अवस्थेतील विदयुत डिपी आहे.(Talwade News)  बसस्थानक नसल्यामुळे नागरिकांना रस्त्याच्या कडेला थांबावे लागते . याच बसथांब्याच्या मागील बाजूला उघडया अवस्थेतील विदयुत डिपी आहे त्यामुळे जिवघेणा अपघात होऊ शकतो.

या विद्युत डीपीच्या बाजूला आणखी दोन डीपी आहेत. हे विद्युत डीपी एक वर्षापासून कोणत्याही प्रकारची सुरक्षेची काळजी न घेता. धोकादायक रित्या उघडे पडलेले आहे. हे उघडे बॉक्स रहदारीच्या रस्त्यालगत असल्यामुळे कधीही मोठी (Talwade News)दुर्घटना , जीवितहानी होऊ शकते.

Sangavi : 2 पिस्टल व 4 जिवंत काडतुसासह सराईत आरोपीला अटक

 शहरामध्ये मागील एक महिन्यापासून वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होत आहे. त्यात अवकाळी येणार्‍या पावसामध्ये रस्त्याच्या कडेला उघडे असणारे हे विद्युत डीपी येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांसाठी धोक्याचे आहेत.(Talwade News) याकडे वीज महामंडळाने साफ दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. तरी महामंडळाने  यावर त्वरीत याेग्य  ती उपाय योजना करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.