Sangavi : 2 पिस्टल व 4 जिवंत काडतुसासह सराईत आरोपीला अटक

एमपीसी न्यूज – सांगवी पोलिसांनी व गोहत्या प्रतिबंधक पथक (Sangavi) यांनी एका सराईत आरोपीला 2 पीस्टल व 4 जिवंत काडतुसासह अटक केली आहे.ही कारवाई पोलिसांनी मंगळवारी (दि.2) रात्री रक्षक चौकाजवळ केली.

राम परशुराम पाटील ( वय 29 वर्षे रा. शिवशोभा बिल्डींग जयमल्हार कॉलनी नं 6 थेरगाव पुणे मुळ गाव टाकळी, ता. उदगीर जिल्हा लातूर ) असे अटक आरोपीचे नाव आहे.

पेट्रोलिंग करत असताना एकजण सॅक घेऊन जात असताना पोलिसांनी त्याला हटकले. हटकले असता तो झुडपतून पळून जाऊ लागला.पोलिसांनी शिताफीने त्याला ताब्यात घेत अंगझडती घेतली असता त्याचे ताब्यात 2 स्टेनलेस स्टिलचे देशी बनावटीचे पिस्टल त्यास स्ट्रिगर गार्ड, मैगजिन असलेले व 4 जिवंत पितळी काडतुस (राऊंड) असा मुद्देमाल मिळून आला.

Pimpri News : बुध्द जयंती निमित्त आंबेडकरी जलसाचा कार्यक्रम उत्साहात साजरा

पोलिसांनी रिमांड घेत चौकशी केली असता आरोपीने रावेत पोलीस ठाणे हद्दीत चैन स्नॅचिंग  केल्याची कबुली दिली. सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी हा सराईत असून त्याच्यावर आर्म ॲक्ट अंतर्गत गुन्हे दाखल आहेत.त्याच्यावर देहूरोड,सांगवी,वाकड,हिंजवडी,रावेत,खडकी येथे गुन्हे दाखल आहेत.

Pimpri : मराठा आरक्षण एल्गार परिषदेतून सरकारला ‘अल्टिमेटम’….  14 मे नंतर आंदोलन

ही कारवाई सांगवी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक  सुनिल टोणपे, सांगवी पोलीस स्टेशन तपास पथकातील प्रमुख पोलीस उप निरीक्षक . एम.डी. वरुडे, पोलीस हवालदार  शिंदे,  संजय डामसे, पोलीस नाइक  प्रविण पाटील,  विजय मोरे,  गोडे, सुहास डंगारे  पाटील खंडागळे,  माने, , शिंगोटे,  लेकुरवाळे तसेच गोहत्या प्रतिबंधक पथकातील सहा पोलीस निरीक्षक गणेश खारगे,  विशाल गायकवाड,  आकाश पांढरे, पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.