MPSC News : महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा-2023 राज्य कर निरीक्षक संवर्गाचा अंतिम निकाल जाहीर

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 5 नोव्हेंबर 2023 रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र (MPSC News) अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा-2023 या परीक्षेतील राज्य कर निरीक्षक संवर्गाच्या एकूण 159 पदांचा अंतिम निकाल आज 15 एप्रिल, 2024 रोजी (MPSC News) जाहीर करण्यात आला आहे.

या परीक्षेमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील अवधूत अनिल दरेकर हे राज्यात प्रथम आले आहेत. तसेच महिला वर्गवारीतून पुणे जिल्ह्यातील अश्लेषा शशिकांत जाधव, ह्या राज्यात प्रथम आल्या आहेत. मागासवर्गवारीतून कोल्हापूर जिल्ह्यातील रोहित विठ्ठल बेहेरे हे राज्यात प्रथम आले आहेत.

उमेदवारांच्या माहितीसाठी या परीक्षेचा अंतिम निकाल व प्रत्येक प्रवर्गाकरीता शिफारसपात्र (MPSC News) ठरलेल्या शेवटच्या उमेदवारांचे गुण (Cut-off marks) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

Salman Khan : सलमान खानच्या घरावरील गोळीबार करणाऱ्या दोघांना भुज मधून अटक 

अंतिम निकालात शिफारसपात्र न ठरलेल्या ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करावयाची आहे. अशा उमेदवारांनी गुणपत्रके प्रोफाईलमध्ये पाठविल्याच्या दिनांकापासून 10 दिवसांत, आयोगाकडे ऑनलाईन पद्धतीने विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी आयोगाच्या संकेतस्थळास भेट द्यावी.

कर सहायक, गट-क या संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीकरीता अर्हताप्राप्त उमेदवारांची यादी प्रसिद्ध

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा-2023, मधील कर सहायक, गट-क या संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीकरिता अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली असून आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. टंकलेखन कौशल्य चाचणी अर्हताकारी / पात्रता (Qualifying) स्वरुपाची असून त्याबाबत उमेदवारांना आयोगाच्या https://mpsc.gov.in संकेतस्थळावर  प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्वतंत्ररित्या कळविण्यात येणार (MPSC News) आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.