Pune : पोलीस उपनिरीक्षकाकडून तरुणीवर बलात्कार, उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज –  पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या एका युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ( Pune)  ओढले. जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यातून ती गर्भवती राहिल्‌यावर तिचा जबरदस्तीने गर्भपात केला. याप्रकरणी 33 वर्षीय पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून एका पोलिस उपनिरीक्षकावर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा प्रकार ऑगस्ट 2017 ते नोव्हेंबर 2022 या कालावधीत शिवाजीनगर गावठाण येथे घडला आहे. किरण माणिक महामुनी (38, रा. नागपूर) असे बलात्काराचा गुन्हा दाखल झालेल्‌या उपनिरीक्षकाचे नाव आहे.

MPSC News : महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा-2023 राज्य कर निरीक्षक संवर्गाचा अंतिम निकाल जाहीर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी किरण महामुनी पोलिस दलात उपनिरीक्षक या पदावर कार्यरत आहे. पीडित युवती पोलिस भरतीची तयारी करत असताना त्यांची किरण सोबत ओळख झाली. त्यानंतर त्यांच्यामध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. आरोपीने पीडितेला शिवाजीनगर गावठाण येथील एका घरी नेले.

त्याठिकाणी तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. आरोपीने पीडित युवतीसोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवले. यातून ती गर्भवती राहिली. हा प्रकार समजल्‌यानंतर किरण महामुनी याने पीडितेला जामखेड तालुक्यातील एका हॉस्पिटलमध्ये नेत इच्छेविरुद्ध गर्भपात केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक काळे या करत ( Pune)  आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.