Pimpri : शहरात महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे नागरिक त्रस्त; आंदोलनाच्या पवित्र्यात

महावितरणच्या मनमानी विरोधात ठोस कारवाई करण्यात यावी: मोढवे पाटलांची मागणी

एमपीसी न्यूज –   चिंचवड मध्ये महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे रहिवासी त्रस्त झाले आहेत. गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून वीजग्राहकांना चुकीचे रीडिंग, वाढीव स्वरूपात विजेची बिले यांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या भोंगळ कारभारामुळे चिंचवड मधील रहिवासी आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.

गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून चिंचवड मधील अनेक ग्राहकांना अवाच्या सवा रकमेची वीज बिले येत आहेत. अनेक ग्राहकांनी भरमसाठी वीज बिल येत असल्याबद्दल तक्रारीही केल्या. मात्र त्यांच्या तक्रारींची दखल घेतली गेली नाही. काहींना तर ही बिले भरावीच लागली. वीजग्राहकांना चुकीचे रीडिंग, वाढीव स्वरूपात विजेची बिले, जलदगतीचे वीज मीटर या समस्यांना वीजग्राहकांना सामोरे जावे लागत आहे. यांमुळे ग्राहकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
विजेचा मीटर बंद असल्याची लेखी तक्रार करूनही अनेक महिने त्याची दखल घेतली जात नाही. मीटर बदलून झाल्यावर त्याचा अहवाल पाठवला जात नाही, तर चुकीचे रीडिंग हा त्रास गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून जास्त जाणवत असल्याचे चिंचवडकरांचे मत आहे. संगणकीकरणाने काहीही फायदा झाला नसून त्रस्त होऊन सुधारलेले बिल भरले तरी त्याची नोंद नसल्याने पुन्हा दुसऱ्या महिन्यात चुकीचे बिल येत असल्याची तक्रार काही ग्राहकांनी केली आहे.

‘भरमसाट बिले कशी?
चिंचवड येथील दिपक मोढ्वे पाटील, मल्लिनाथ कल्लशेट्टी यांच्यासह इतर अनेक ग्राहकांना गेल्या वर्षभरापासून सारख्याच युनिट्चे भरमसाट रकमेची वीज बिले देण्यात आली आहेत. खूप वेळा मीटर बदलण्याची तक्रार करूनही महावितरणच्या अधिकाऱ्यांनी याच्याकडे लक्ष दिलेले नाही. तक्रार करण्यासाठी गेले असता मिटर कनेक्शन अखंडित करण्यासाठी कामगार घरी पाठवून मनमानी केली जात आहे. चुकीच्या रीडिंगची तक्रार केली असता बिल कमी करून दिले जात नाहीत. त्यामुळे महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या मनमानी विरोधात ठोस कारवाई करण्यात यावी, मुख्य अभियंत्यास बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी लधु उद्योग संघटना सल्लागार व सामाजिक कार्यकर्ते  दिपक मोढवे पाटील यांनी केली आहे.
शहरातील कोणत्याही नागरिकाची महावितरणकडून दखल घेतली जात नसेल तर  7057747474 / 9332747474 / 97077474747 या क्रमांकावरती संपर्क साघावा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.