Mumbai: चीनमधील कंपन्यांसोबत करण्यात आलेले करार सध्या ‘जैसे थे’ – उद्योगमंत्री

Mumbai: Agreements with Chinese companies are currently 'as they were' - Industry Minister तीन चिनी कंपन्यांनी तळेगाव टप्पा-२ पुणे येथे 5020 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याबाबत सामंजस्य करार केलेला आहे.

एमपीसी न्यूज – हेंगली, पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी सोल्युशन्स जेव्ही विथ फोटोन आणि ग्रेट वॉल मोटर्स या चीन येथील तीन कंपन्यांसमवेत महाराष्ट्र शासनाने 15 जून रोजी केलेले सामंजस्य करार तूर्तास ‘जैसे थे’ ठेवण्यात आले आहेत, असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी स्पष्ट केले आहे.

हे करार तूर्तास जैसे थे ठेवण्यात आले आहेत, याचा अर्थ ते रद्द केले असा नसून त्यावरील पुढील कार्यवाही प्रतीक्षाधीन आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

हेंगली, पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी सोल्युशन्स जेव्ही विथ फोटोन आणि ग्रेट वॉल मोटर्स या तीन कंपन्यांनी अनुक्रमे 250 कोटी, 1 हजार कोटी आणि 3 हजार 770 कोटी रुपयांची गुंतवणूक राज्यातील तळेगाव टप्पा-२ पुणेमध्ये करण्यासाठी सामंजस्य करार केलेला आहे.

एकूण 5 हजार 020 कोटी रुपयांच्या या प्रकल्पांसंदर्भात सध्याच्या वातावरणात केंद्र शासनाकडून स्पष्ट धोरण जाहीर होण्याची वाट पाहण्यात येईल, असेही मंत्री देसाई यांनी स्पष्ट केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.