Mumbai : सिल्वर ओक मधील बैठक संपली…. साडेतीन वाजता पत्रकार परिषदेत अजित पवार बोलणार !

एमपीसी न्यूज- शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी पवार कुटुंबीयांची झालेली बैठक संपली आहे. तब्बल दीड तास चाललेल्या या बैठकीत काय घडले, कोणता निर्णय घेण्यात आला याबद्दल अजित पवार हे धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ठ करणार आहेत. साडेतीन वाजता वाय बी सेंटर येथे पत्रकार परिषद पार पडणार आहे. दरम्यान, पवार कुटुंबीयांमध्ये कुटुंब प्रमुखांकडून घेण्यात येणारा निर्णय सर्व कुटुंबाला बांधील असतो. चिंता करण्याचे कारण नसून अजित पवार काय बोलणार हे त्यांच्या तोंडूनच ऐका असे शरद पवार यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.