Sushant searched Painless Death – मृत्यूपूर्वी सुशांतने सर्च केला होता ‘वेदनारहित मृत्यू’

Before his death, Sushant had searched for 'painless death'

एमपीसी न्यूज – सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येच्या तपासाला दररोज वेगळे वळण लागत आहे. मुंबई पोलीस योग्य तपास करु देत नाहीत, असे कधी बिहार पोलिस सांगतात, तर कधी ते तपासात योग्य ते सहकार्य करत आहेत असे सांगितले जाते. त्यातच सुशांतचे निकटवर्तीय रोज काहीतरी नवे सत्य आहे असे दर्शवत आहेत.

कधी बॉलिवूडमधील दिग्गज या प्रकरणी आपले धक्कादायक मत मांडत आहेत. त्यातच या प्रकरणाची योग्य ती तपासणी होत नसल्याचा आरोपही मुंबई पोलिसांवर होत आहे.

या सर्व गदारोळाच्या पार्श्वभूमीवर सध्या सुरु असलेल्या चौकशीबद्दल मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी सोमवारी माध्यमांना औपचारिक निवेदन दिले.

सुशांतच्या निधनाच्या आदल्या रात्री त्याच्या घरी झालेल्या कथित पार्टीच्या अफवेचे त्यांनी खंडन केले. तसेच ते म्हणाले की, पोलिसांनी तपासात‘कोणालाही सोडले नाही’ आणि आजपर्यंत जवळपास 56 जबाब नोंदले गेले आहेत.

यावेळी आयुक्तांनी आणखी एक वेगळी माहिती दिली. सुशांतने मृत्यूपूर्वी गुगलवर इतरही गोष्टींबरोबरच ‘वेदनारहित मृत्यू’ शोधला असल्याचेही उघडकीस आले.

पोलिसांनी त्याच्या लॅपटॉप व फोनवरुन काही माहिती मिळवली आहे, ज्यात सुशांतकडून त्याच्या वकीलाला संदेश आला होता की, ‘कोण आहे दिशा सालिआन, याचा कृपया शोधा.’

सुशांत 9 जून रोजी आत्महत्या करुन मृत्यू पावलेल्या दिशा सालियन या त्याच्या माजी मॅनेजरच्या मृत्युशी त्याचे नाव जोडले गेल्याच्या घटनेवरुन दु:खी झाला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.