Bollywood : कपिल शर्मा, श्रद्धा कपूर, हुमा कुरैशी यांना ईडीचे समन्स

एमपीसी न्यूज – दोन दिवसांपूर्वी अभिनेता रणबीर कपूर याला (Bollywood) महादेव ऑनलाईन गेमिंग व बेटिंग अॅप प्रकरणी ईडीने समन्स पाठवले होते. त्यानुसार त्याला आज ईडी समोर उपस्थित राहण्याची नोटीस देण्यात आली होती. याच प्रकरणाशी संबंधित ईडीने आता विनोदी कलाकार कपिल शर्मा, अभिनेत्री श्रद्धा कपूर, हुमा कुरैशी आणि टी.व्ही कलाकार हीना खान यांना समन्स धाडले आहे.

महादेव गेमिंग अॅप च्या माध्यमातून लोकांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात तक्रारी वाढल्या होत्या. त्यानुषंगाने कारवाई करत शासनाद्वारे महदेव गेमिंग अॅप वर भारतात बंदी आणली आहे.

Reservation News : तात्पुरत्या सरकारी नोकऱ्यांसाठी देखील आरक्षण लागू

महादेव गेमिंग अॅप  प्रमोट करणाऱ्या आरोपी सौरभ चंद्राकर याच्या विवाह सोहळ्याला उपस्थित असणाऱ्या कलाकारांना ईडी (Bollywood) कडून समन्स पाठवण्यात येत आहे. या विवाह सोहळा दुबई येथे पार पडला असून त्यासाठी 200 कोटी रुपये इतका खर्च करण्यात आला आहे.

त्याठिकाणी काही कलाकारांनी परफॉर्मन्सही केले आहे. याबाबत आता कपिल शर्मा, श्रद्धा कपूर, हुमा कुरैशी आणि टी.व्ही कलाकार हीना खान यांना ईडी ने समन्स पाठवले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.