Khed : सुरक्षारक्षकाला पैशाच्या कारणावरून दगड व पट्ट्याने मारहाण

एमपीसी न्यूज – पैशाच्या कारणावरून (Khed) तीन जणांनी एका सुरक्षारक्षकाला पट्ट्याने, दगडाने व फायटरने मारहाण करत गंभीर जखमी केले आहे. ही घटना बुधवारी ( दि.4) खेड तालुक्यातील मिंडेवाडी येथे घडली.

याप्रकरणी राहुल दत्तात्रय टोपे (वय 27 रा वाकी). यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून पोलिसांनी नारायण सोपान दाभाडे, नितीन विठ्ठल घोलप, संतोष गाडे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना पैशाच्या कारणावरून आरोपींनी हाताने लोखंडी टॉमी फलटण पट्ट्याने व दगडाने बेदम मारहाण केली.

Bollywood : कपिल शर्मा, श्रद्धा कपूर, हुमा कुरैशी यांना ईडीचे समन्स

यामध्ये फिर्यादी यांचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले. त्यांना इतरही गंभीर दुखापती झाल्या आहेत. यावरून महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी तीनही आरोपी विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. अद्याप या प्रकरणी कोणाला अटक झाली (Khed) नसून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.